शार्दुल ठाकूरसोबत वॉशिंगटन सुंदर यानं निर्णायक क्षणी सातव्या गड्यासाठी शतकी भागिदारी केली. या जोडीनं सातव्या गड्यासाठी १२३ धावांची भागिदारी केली. सुंदरनं ६२ धावांची महत्वपूर्ण खेळी केली. भरवशाचे फलंदाज झटपट माघारी परतल्यानंतर वॉशिंग्टन सुंदर आणि शार्दुल ठाकूर या दोघांनी भारताचा डाव सावरला. यात वॉशिंग्टन सुंदरने लगावलेला षटकार चांगलाच चर्चेत आला आहे. सोशल मीडियावर सुंदरच्या त्या षटकाराची चर्चा आहे. १०४ व्या षटकात गोलंदाजीला आलेल्या नॅथन लायनच्या एका चेंडूवर त्याने एका पायावर बसून लॉग ऑनच्या दिशेने उत्तुंग असा फटका मारत गगनचुंबी षटकार खेचला. षटकार मारल्यानंतर सुंदरनं चेंडूकडे न बघता आपली नजर धावपट्टीवर ठेवली. त्याच्यामध्ये इतका आत्मविश्वास होती की, त्याने चेंडू सीमापार जातो की नाही हे सुद्धा पाहिली नाही.
वॉशिंग्टन सुंदरने आपल्या फलंदाजीची प्रतिभा दाखवून दिली. खालच्या फळीतील फलंदाज बॅट फिरवतात आणि चुकून चौकार षटकार जातात हे तर नेहमीच पाहिलं जातं. पण वॉशिंग्टन सुंदरने एखाद्या अनुभवी फलंदाजाप्रमाणे खणखणीत षटकार मारला. त्याची षटकार मारण्याची स्टाइल पाहून नेटकरी फिदा झालेत. अनेक माजी दिग्गज क्रिकेटपूनं सुंदरच्या या षटकाराचे कौतुकही केलं आहे. सुंदरचा हा षटकार पाहून समालोचन करत असलेल्या मोहम्मद कैफला युवराज सिंगची आठवण आली.
पाहा षटकार –
That’s spicy! A no-look six from Sundar
Live #AUSvIND: https://t.co/IzttOVtrUu pic.twitter.com/6JAdnEICnb
— cricket.com.au (@cricketcomau) January 17, 2021
आणखी वाचा- ‘सुंदर’ खेळीनं त्यानं कोट्यावधी चाहत्यांची मन जिंकली मात्र वडील म्हणतात…
पदार्पणात अष्टपैलू कामगिरी….
भारताचा युवा खेळाडू वॉशिंग्टन सुंदर याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध अष्टपैलू कामगिरी करत यशस्वीपणे पर्दापण केले आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या ऑस्ट्रेलियाचा डाव ३६९ धावांवर गुंडाळण्यात सुंदरने मोलाचा वाटा उचलला होता. त्याने ऑस्ट्रेलियाच्या प्रमुख तीन फलंदाजांना माघारी धाडले होते. यात अनुभवी फलंदाज स्टिव्ह स्मिथ हा त्याचा पहिला शिकार ठरला. यानंतर त्याने कॅमरॉन ग्रीन आणि नॅथन लियॉन यांना त्रिफळाचीत भारताला यश मिळवून दिले. त्यानंतर भारताकडून पहिल्या डावात कठीण प्रसंगी फलंदाजी करताना १४४ चेंडूत ६२ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने एक षटकार आणि ७ चौकार खेचले.