भारत आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या एजबस्टन कसोटी सामन्याच्या चौथ्या डावात जो रूटने आक्रमक खेळी करत शतक झळकावले. हे त्याच्या कारकिर्दीतील २८वे कसोटी शतक ठरले. रूट अलीकडच्या काळात जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. २०२१पासून आतापर्यंत त्याने २४ कसोटी सामने खेळले आहेत आणि एकूण ११ शतके झळकावली आहेत. रूटने या कालावधीत एकूण दोन हजार ६३५ धावा केल्या आहेत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सध्या त्याची जोरदार चर्चा आहे. या दरम्यान जो रूटचा मायकल वॉनसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

जो रूट आणि मायकल वॉनचा जो फोटो व्हायरल झाला आहे, त्यामध्ये किशोरवयात असलेला जो रूट दिसत आहे. लहानपणी एका क्रिकेट स्पर्धेनंतर जो रूटला मायकल वॉनच्या हातून ट्रॉफी मिळाली होती. त्यावेळचा हा फोटो आहे. त्यावेळी मायकल वॉनला कदाचित कल्पनाही नसेल की हाच मुलगा भविष्यात इंग्लंड क्रिकेटचा गौरव वाढण्यास हातभार लावेल.

नुकत्याच पार पडलेल्या भारताविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत रूटने एकून ७३७ धावा केल्या. त्यामध्ये चार शतकांचा समावेश आहे. भारत-इंग्लंड कसोटी मालिकेत रूट व्यतिरिक्त इतर कोणताही फलंदाज ४५० पेक्षा जास्त धावा करू शकलेला नाही.

हेही वाचा – Virat Kohli : इंग्लिश चाहत्यांपाठोपाठ बोर्डाच्याही ट्वीटरवर कुरापती; दिग्गज भारतीय खेळाडूची केली टिंगल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सध्याच्या कसोटी क्रमवारीत रुट हा पहिल्या क्रमांकाचा फलंदाज आहे. भारताविरुद्ध एजबस्टन कसोटी सामन्यात त्याने कारकिर्दीतील २८वे शतक पूर्ण केले. अशी कामगिरी करून त्याने विराट कोहलीला मागे टाकले आहे. कोहलीने आपल्या कसोटी कारकिर्दीत आतापर्यंत २७ शतके झळकावली आहेत. रूट हा इंग्लंडकडून सर्वाधिक कसोटी शतके करणारा दुसरा फलंदाज आहे. त्यापूर्वी, अॅलिस्टर कुकने इंग्लंडकडून कसोटीत सर्वाधिक ३३ शतके झळकावलेली आहेत.