भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकेच्या दुसऱया कसोटी सामन्याच्या पाचव्या दिवशी भारतीय संघावर पराभवाचे सावट आले आहे. पाचव्या दिवसाच्या खेळाला सुरूवात होताच पहिल्याच चेंडुवर विराट कोहली बाद झाला. त्यानंतर चेतेश्वर पुजाराही त्रिफळा बाद होऊन माघारी परतला. या दोन्ही विकेट्स दक्षिण आफ्रिकेचा गतीमान गोलंदाज डेल स्टेनने खिशात घातल्या त्यानंतर फिलँडरने रोहीत शर्मालाही २५ धावांवर तंबूत धाडले आणि भारतीय संघावर पराभवाचे संकट ओढावून दिले.
युवा फलंदाज अजिंक्य रहाणेला साथ देत धोनीने बचावात्मक खेळी करून भारतीय संघाचा डाव सांभाळण्यास सुरूवात केली होती. परंतु, धोनीनेही रहाणेची साथ सोडली आणि केवळ १५ धावा करून धोनी बाद झाला. त्यानंतर आलेल्या रविंद्र जडेजानेही निराशाच केली. जडेजा अवघ्या ८ धावा करून तंबूत परतला आहे. 
सध्या मैदानावर अजिंक्य रहणे आफ्रिकन गोलंदाजीला झुंझ देत आहे. भारताच्या दुसऱया डावातील आता सात विकेट्स गेल्या असून भारत पराभवाच्या संकटात आहे.