IND vs WI 1st ODI Updates, 22th July : भारत आणि वेस्ट इंडीज दरम्यान शक्रवारपासून (२२ जुलै) तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जात सुरू झाली. पोर्ट ऑफ स्पेनमधील क्वीन्स पार्क ओव्हल क्रिकेट स्टेडियमवर झालेला पहिला सामना भारताने तीन धावांनी जिंकला आहे. वेस्ट इंडीजचा कर्णधार निकोलस पूरनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजीसाठी मैदानावर आलेल्या भारतीय संघाने दमदार फलंदाजी करून वेस्ट इंडीजसमोर विजयासाठी ३०९ धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात वेस्ट इंडीजला ५० षटकांमध्ये ३०५ धावा करता आल्या.

Live Updates

IND vs WI 1st ODI Live Updates: भारत विरुद्ध वेस्ट इंडीज एकदिवसीय सामन्यातील सर्व लाइव्ह अपडेट्स

02:43 (IST) 23 Jul 2022
विंडीजचा सहावा गडी बाद

युझवेंद्र चहलने विंडीजचा सहावा गडी बाद केला आहे. ब्रँडन किंग ५४ धावा करून बाद झाला.

02:34 (IST) 23 Jul 2022
ब्रँडन किंगचे अर्धशतक पूर्ण

विंडीजचा फलंदाज ब्रँडन किंगने अर्धशतक पूर्ण केले आहे. त्याने ६२ चेंडूत ५१ धावा केल्या.

02:05 (IST) 23 Jul 2022
वेस्ट इंडीजचा पाचवा गडी तंबूत

वेस्ट इंडीजचा पाचवा गडी तंबूत परतला आहे. रोमन पॉव्हेल अवघ्या सहा धावा करून बाद झाला. वेस्ट इंडीजच्या ३७ षटकांमध्ये पाच बाद १९७ धावा झाल्या आहेत.

01:57 (IST) 23 Jul 2022
कर्णधार निकोलस पूरन बाद

कर्णधार निकोलस पूरनच्या रुपात विंडीजचा चौथा गडी बाद झाला आहे. मोहम्मद सिराजने त्याला २५ धावांवर बाद केले.

01:53 (IST) 23 Jul 2022
३५ षटकांमध्ये यजमानांच्या तीन बाद १८८ धावा

३५ षटकांमध्ये वेस्ट इंडीजच्या तीन बाद १८८ धावा झाल्या आहेत. कर्णधार निकोलस पूरन २५ आणि ब्रँडन किंग २८ धावांवर खेळत आहेत.

01:10 (IST) 23 Jul 2022
वेस्ट इंडीजचा तिसरा गडी माघारी

कायले मायर्सच्या रुपात यजमानांचा तिसरा गडी बाद झाला आहे. मायर्सने ६८ चेंडूत ७५ धावा केल्या.

01:06 (IST) 23 Jul 2022
२५ षटकांमध्ये यजमानांच्या दोन बाद १३७ धावा

२५ षटकांमध्ये यजमानांच्या दोन बाद १३७ धावा झाल्या आहेत. कायले मायर्स आणि ब्रँडन किंग दोघेजण खेळपट्टीवर उपस्थित आहेत.

01:02 (IST) 23 Jul 2022
शमारह ब्रूक्सच्या रुपात विंडीजचा दुसरा गडी बाद

शमारह ब्रूक्स ४६ धावा करून बाद झाला. शार्दुल ठाकूरच्या गोलंदाजीवर अय्यरने त्याचा झेल टिपला.

00:45 (IST) 23 Jul 2022
२० षटकांमध्ये वेस्ट इंडीजच्या एक बाद १०३ धावा

शमारह ब्रूक्स आणि कायले मायर्स यांनी फटकेबाजी सुरू केली आहे. मायर्सचे अर्धशतक पूर्ण झाले असून संघाने २० षटकांमध्ये एक बाद १०३ धावा केल्या आहेत

00:32 (IST) 23 Jul 2022
कायले मायर्सचे अर्धशतक

वेस्ट इंडीजचा सलामीवीर कायले मायर्सने अर्धशतक पूर्ण केले आहे. त्याने ४२ चेंडूत ८ चौकारांच्या मदतीने ५० धावा केल्या.

00:27 (IST) 23 Jul 2022
१५ षटकांमध्ये वेस्ट इंडीजच्या एक बाद ८८ धावा

शमारह ब्रूक्स आणि कायले मायर्स यांनी फटकेबाजी सुरू केली आहे. १५ षटकांमध्ये वेस्ट इंडीजच्या एक बाद ८८ धावा झाल्या आहेत.

00:04 (IST) 23 Jul 2022
१० षटकांमध्ये वेस्ट इंडीजच्या एक बाद ५२ धावा

१० षटकांमध्ये वेस्ट इंडीजच्या एक बाद ५२ धावा झाल्या आहेत. शमारह ब्रूक्स आणि कायले मायर्स डाव पुढे नेत आहेत.

23:40 (IST) 22 Jul 2022
वेस्ट इंडीजला पहिला धक्का

वेस्ट इंडीजला पहिला धक्का बसला आहे. मोहम्मद सिराजे शाय होपला सात धावांवर बाद केले. विंडीजच्या पाच षटकांमध्ये १६ धावा झाल्या आहेत.

23:35 (IST) 22 Jul 2022
चार षटकांमध्ये विंडीजच्या बिनबाद १२ धावा

यजमानांनी डावाची सावध सुरुवात केली आहे. चार षटकांमध्ये विंडीजच्या बिनबाद १२ धावा झाल्या आहेत.

23:20 (IST) 22 Jul 2022
वेस्ट इंडीजच्या डावाला सुरुवात

भारताने दिलेले विशाल लक्ष्य पार करण्यासाठी यजमान संघ मैदानात उतरला आहे.

22:53 (IST) 22 Jul 2022
वेस्ट इंडीजसमोर विजयासाठी ३०९ धावांचे लक्ष्य

भारतीय संघाने दमदार फलंदाजी करून वेस्ट इंडीजसमोर विजयासाठी ३०९ धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

22:45 (IST) 22 Jul 2022
अल्जारी जोसेफचे ४९ व्या षटकात भारताला दोन धक्के

दीपक हुड्डाच्या रुपात भारताचा सातवा गडी बाद झाला. त्याने २७ धावा केल्या.

22:42 (IST) 22 Jul 2022
अक्षर पटेलच्या रुपात भारताचा सहावा गडी बाद

अक्षर पटेलच्या रुपात भारताचा सहावा गडी बाद झाला आहे. त्याने २१ चेंडूत २१ धावा केल्या. भारताच्या सहा बाद २९४ धावा झाल्या आहेत.

22:22 (IST) 22 Jul 2022
४५ षटकांमध्ये भारताच्या पाच बाद २६३ धावा

४५ षटकांमध्ये भारताच्या पाच बाद २६३ धावा झाल्या आहेत. दीपक हुड्डा आणि अक्षर पटेल खेळपट्टीवर उपस्थित आहेत.

22:11 (IST) 22 Jul 2022
भारताचा पाचवा गडी बाद

संजू सॅमसनच्या रुपात भारताचा पाचवा गडी बाद झाला आहे. भारताच्या पाच बाद २५२ धावा झाल्या आहेत.

21:53 (IST) 22 Jul 2022
भारताचा चौथा गडी बाद

सूर्यकुमार यादवच्या रुपात भारताचा चौथा गडी बाद झाला आहे. त्याने १४ चेंडूत १३ धावा केल्या. ३९ षटकांमध्ये भारताच्या चार बाद २४८ धावा झाल्या आहेत.

21:40 (IST) 22 Jul 2022
श्रेयस अय्यरच्या रुपात भारताचा तिसरा गडी बाद

अर्धशतक पूर्ण केल्यानंतर श्रेयस अय्यर बाद झाला. ३६ षटकांमध्ये भारताच्या तीन बाद २३१ धावा झाल्या आहेत.

21:36 (IST) 22 Jul 2022
श्रेयस अय्यरचे अर्धशतक

भारतीय फलंदाज श्रेयस अय्यरने अर्धशतक पूर्ण केले. त्याने ५३ चेंडूत चार चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने ५० धावा केल्या.

21:32 (IST) 22 Jul 2022
शिखर धवनचे शतक हुकले

भारतीय संघाचा कर्णधार शिखर धवन ९७ धावा करून बाद झाला. शमारह ब्रूक्सने त्याचा शानदार झेल टिपला. भारताच्या ३४ षटकांमध्ये दोन बाद २१४ धावा झाल्या आहेत.

21:20 (IST) 22 Jul 2022
भारताचा धावफलक दोनशेपार

३२व्या षटकामध्ये भारताचा धावफलक एक बाद दोनशेपार गेला आहे. शिखर धवन शतकाच्या तर श्रेयस अय्यर अर्धशतकाच्या जवळ आहेत.

21:11 (IST) 22 Jul 2022
३० षटकांमध्ये भारताच्या एक बाद १८४ धावा

पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय फलंदाजांनी दमदार कामगिरी केली आहे. ३० षटकांमध्ये भारताच्या एक बाद १८४ धावा झाल्या आहेत. शिखर धवन शतकाच्या उंबरठ्यावर आहे.

20:52 (IST) 22 Jul 2022
भारताचे दीडशतक पूर्ण

२५ षटकामध्ये भारताच्या १५० धावा पूर्ण झाल्या आहेत. कर्णधार शिखर धवन आणि श्रेयस अय्यर भारतीय डाव पुढे नेत आहेत.

20:32 (IST) 22 Jul 2022
२० षटकांमध्ये भारताच्या एक बाद १२७ धावा

२० षटकांमध्ये भारताच्या एक बाद १२७ धावा झाल्या आहेत. कर्णधार शिखर धवन आणि श्रेयस अय्यर खेळपट्टीवर उपस्थित आहेत.

20:25 (IST) 22 Jul 2022
भारताचा पहिला गडी बाद

सलामीवीर शुभमन गिल ६४ धावा करून बाद झाला आहे. १८ षटकांमध्ये भारताच्या एक बाद १२० धावा झाल्या आहेत.

20:21 (IST) 22 Jul 2022
भारतीय कर्णधाराचे अर्धशतक

भारतीय कर्णधार शिखर धवनने अर्धशतक पूर्ण केले. त्याने ५३ चेंडूंमध्ये आठ चौकार आणि षटकाराच्या मदतीने ५० धावा केल्या.