scorecardresearch

Premium

IND vs WI 1st ODI : धवन अँड कंपनीची विजयी सुरुवात; रोमहर्षक लढतीत वेस्ट इंडीजचा तीन धावांनी पराभव

India vs West Indies 1st ODI : क्वीन्स पार्क ओव्हल मैदानावर भारतीय संघ गेल्या १५ वर्षांपासून एकदिवसीय सामना हरलेला नाही.

IND vs WI 1st odi Result Marathi
फोटो सौजन्य – ट्विटर

IND vs WI 1st ODI Result: भारत आणि वेस्ट इंडीज दरम्यान शुक्रवारपासून (२२ जुलै) तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका सुरू झाली आहे. पोर्ट ऑफ स्पेनमधील क्वीन्स पार्क ओव्हल क्रिकेट स्टेडियमवर या मालिकेतील पहिला सामना झाला. ही अतितटीची लढत भारताने तीन धावांनी जिंकली आहे. त्यामुळे भारताला मालिकेत १-० अशी आघाडी मिळाली आहे. भारताने वेस्ट इंडीजला ३०९ धावांचे लक्ष्य दिले होते.

भारताने दिलेले ३०९ धावांचे आव्हान पार करण्यासाठी मैदानावर आलेल्या यजमानांची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. सलामीवीर शाय होप सात धावा करून बाद झाला. त्यानंतर मात्र, कायले मायर्स आणि शमराह ब्रूक्स यांनी दमदार खेळ दाखवत विंडीजच्या डावाला आकार दिला. मायर्सने ७५ आणि ब्रूक्सने ४६ धावा केल्या. त्यापाठोपाठ ब्रँडन किंगने अर्धशतकी खेळी करून संघाला मजबूत स्थितीमध्ये आणले. शेवटी अकील हुसेन आणि रोमरिओ शेफर्ड जोडी भारताच्या तोंडचे पाणी पळवले होते. शेवटच्या षटकात वेस्ट इंडीजला विजयासाठी १५ धावांची गरज होती. मात्र, विंडीजचा संघ केवळ ११ धावाच करू शकला.

AUS vs WI 2nd Test Match Updates in marathi
AUS vs WI 2nd Test : वेस्ट इंडिजचा ऑस्ट्रेलियावर ८ धावांनी ऐतिहासिक विजय, शमर जोसेफ ठरला विजयाचा शिल्पकार
U19 World Cup 2024 fastest fifty record
U19 World Cup 2024 : ६,६,६,६,४,६…दक्षिण आफ्रिकेच्या स्टीव्ह स्टॉकने ऋषभ पंतचा विक्रम मोडत रचला इतिहास
IND vs ENG 1st Test Match Updates in marathi
IND vs ENG : बेन स्टोक्सला क्लीन बोल्ड करत आर आश्विनने केला मोठा पराक्रम, कसोटीत क्रिकेटमध्ये नोंदवला खास विक्रम
england allout 246
Ind vs Eng: पहिल्या दिवशी इंग्लंड बॅकफूटवर; सर्वबाद २४६, यशस्वीची दमदार सुरुवात

त्यापूर्वी, वेस्ट इंडीजचा कर्णधार निकोलस पूरनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. शुभमन गिल आणि शिखर धवनने भारताला दमदार सुरुवात करून दिली. दोघांनी पहिल्या गड्यासाठी शतकी भागीदारी केली. गिल ६४ धावांवर बाद झाला. त्यानंतर श्रेयस अय्यर आणि धवन यांनी दुसऱ्या गड्यासाठी ९० धावांची भागीदारी केली.

श्रेयस अय्यरने ५४ धावांचे योगदान दिले. भारताचा कर्णधार शिखर धवनचे शतक अवघ्या तीन धावांनी हुकले. त्याने ९९ चेंडूत ९७ धावा केल्या. त्याच्या या खेळीदरम्याने त्याने १० चौकार आणि तीन षटकार लगावले. त्यानंतर आलेला सूर्यकुमार अवघ्या १३ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. यष्टिरक्षक संजू सॅमसनने १३ तर दीपक हुडाने ३२ चेंडूत २७ धावांचे योगदान दिले. वेस्टइंडीच्यावतीने अल्जारी जोसेफ आणि गुडाकेश मोतीने प्रत्येकी दोन-दोन गडी बाद केले.

भारतीय संघाचा नियमित कर्णधार रोहित शर्माला या मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे शिखर धवनकडे संघाचे नेतृत्व आले आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: India vs west indies 1st odi india beat west indies by 3 runs vkk

First published on: 23-07-2022 at 03:28 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×