वेस्ट इंडिजचे खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपल्या वेगळ्या स्टाईलमुळे ओळखले जातात. पुणे येथे झालेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजच्या अॅशले नर्सची अशीच हटके स्टाईल पहायला मिळाली. या सामन्यात अॅशले नर्सने अष्टपैलू कामगिरी करत संघाच्या विजयात महत्वाची भूमिका बजावली होती. फलंदाजीवेळी वेगाने धावा काढल्या आणि गोलंदाजीतही आपली चमक दाखवली.

सलामिवीर शिखर धवनला बाद केल्यानंतर अॅशले नर्सने ‘बाबाजी का ठुल्लू’ स्टाईलमध्ये सेलिब्रेशन करत एकप्रकारे भारतीयांना खिजवलेय. तिसऱ्या सामन्यात सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरलेल्या अॅशले नर्सचे हे हटके सेलिब्रेशन सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय आहे. अॅशलेची ही स्टाईल भारतीय विनोदवीर कपिल शर्मासारखी आहे. आपल्या शोमध्ये कपील शर्मा बाबजी का ठुल्लू स्टाईल वापरत असे. त्यामुळे भारतीय नेटकरी अॅशलेच्या या स्टाईलवर आधिक रंजकपणे चर्चा करत आहेत.

क्रिकेटच्या मैदानावर अशा प्रकारचे सेलिब्रेशन पहिल्यांदाच पहायला मिळाले आहे. ‘बाबाजी का ठुल्लू’ ही स्टाईल एका भारतीय मित्राकडून शिकल्याचा खुलासा नर्सने केला आहे. आपल्या या हटके सेलिब्रेशनबद्दल तो म्हणाला की, “आनंद व्यक्त करण्याच्या प्रत्येकाच्या पद्धती वेगळ्या असतात. आम्ही काही वर्षांपूर्वी चॅम्पियन्स या गाण्याच्या स्टाईलवरून सेलिब्रेशन करायचो. पण एका लीगमध्ये खेळताना मला सनी सोहेल या माझ्या भारतीय मित्राने मला बाबाजी का ठुल्लू स्टाईलबद्दल सांगितले. त्यानंतर मी ही स्टाईल आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही पाहिली आणि ती मला चांगलीच आवडली. त्यामुळे विकेट मिळाल्यानंतर मी या स्टाईलमध्ये सेलिब्रेशन केले. यानंतर आता मी आनंद साजरा करताना बाबाजी का ठुल्लू स्टाईलने करणार आहे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तिसऱ्या एकदिवसीय सामन्या अॅशले नर्सने मोक्याच्या क्षणी २२ चेंडूत ४० धावांची खेळी केली होती. नर्सच्या या झटपट खेळीच्या बळावर वेस्ट इंडिजने भारतासमोर २८४ धावांचे आव्हान ठेवले होते.