जन गण मन अधिनायक जय हे… १३ वर्षानंतर ऑलिम्पिकमध्ये वाजलं भारताचं राष्ट्रगीत; Video पाहताच अंगावर काटा येईल

भारताचा झेंडाही मध्यभागी मानाने फडकताना दिसला. ऑलिम्पिकमधील भारताचं वैयक्तिक दुसरं सुवर्ण पदक आहे. यापूर्वी भारताने हॉकीत ८ सुवर्ण पदकं पटकावली आहेत.

Neeraj Chopra Gold Medal Indian National anthem
१३ वर्षानंतर भारताचं राष्ट्रगीत ऑलिम्पिकमध्ये वाजलं. (फोटो ट्विटरवकरुन साभार)

भारताचा २३ वर्षीय भालाफेकपटू नीरज चोप्राने ऐतिहासिक कामगिरी केलीय. नीरजने भालाफेक स्पर्धेत सुवर्णपदक पटाकवलं आहे. नीरजने भालफेक स्पर्धेच्या अंतिम फेरी पहिल्याच प्रयत्नात ८७.०३ मीटर तर दुसऱ्या प्रयत्नात ८७.५८ मीटरपर्यंत भाला फेकत सुवर्णपदकावर नाव कोरलं. या विजयामुळे अभिनव बिंद्रानंतर तब्बल १३ वर्षांनी कोणत्याही भारतीय खेळाडूने आपल्या गळ्यात ऑलिम्पिकचं पदक घातल्याचं चित्र पहायला मिळालं. पदक प्रदान करण्यात आल्यानंतर भारताचं राष्ट्रगीतही वाजवण्यात आलं. तब्बल एका तपाहून अधिक काळानंतर ऑलिम्पिकच्या मैदानात भारताचं राष्ट्रगीत वाजलेलं पाहून अनेकांना अश्रू अनावर झाल्याचं त्यांनी ट्विटरवरुन म्हटलं आहे.

नक्की पाहा हे फोटो >> …अन् गोल्ड मेडल नीरजच्या गळ्यात; डोळ्यात आणि मनात साठवून ठेवावेत असे ‘सुवर्ण’क्षण

पात्रता फेरीत अव्वल स्थानी राहिलेल्या नीरजने अंतिम फेरीमध्येही अव्वल स्थान पटकावत भारताचा सुवर्णपदकाचा दुष्काळ १३ वर्षानंतर संपवला. नीरजने पहिली फेक ८७.०३ मीटर, दुसरी फेक ८७.५८ मीटर, तिसरी फेक ७६.७९ मीटर लांब केली. पहिल्या तीन फेऱ्यांमध्ये नीरज आघाडीवर होता. चौथा आणि पाचवा प्रयत्न फाउल ठरला. मात्र पहिल्या तीन प्रयत्नांमधील त्याची कामगिरीच निर्णायक ठरली. नीरजने सुवर्ण पदक मिळवून स्पर्धेचा शेवट गोड केला आहे. बीजिंग ऑलिम्पिक २००८ नंतर हे भारताचं पहिलं गोल्ड मेडल आहे.

करोनामुळे यंदा ऑलिम्पिक पदक खेळाडूच स्वत: स्वत:च्या गळ्यात घालतात आणि नंतर प्रथम क्रमांकावरील खेळाडूच्या देशाचं राष्ट्रगीत वाजवलं जातं. भारताचा झेंडाही मध्यभागी मानाने फडकताना दिसला. नीरजनेही आज सुवर्णपदक स्वत:च्या हाताने स्वत:च्या गळ्यात घातलं. मात्र त्याआधी त्याने मेडलचं चुंबन घेतलं. नंतर ऑलिम्पिकच्या मैदानात भारताचे राष्ट्रगीत वाजलं. हे व्हिडीओ अनेकांनी शेअर केलेत.

१)

२)

३)

४)

५)

नीरज चोप्राच्या आधी बीजिंग ऑलिम्पिकमध्ये नेमबाज अभिनव बिंद्राने सुवर्ण पदक जिंकलं होतं. ऑलिम्पिकमधील भारताचं वैयक्तिक दुसरं सुवर्ण पदक आहे. यापूर्वी भारताने हॉकीत ८ सुवर्ण पदकं पटकावली आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Indian national anthem during the medal ceremony at tokyo 2020 olympic scsg