राजस्थान रॉयल्सवर ३३ धावांनी मात

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

श्रेयस अय्यरची (४३) चांगली फलंदाजी आणि गोलंदाजांनी केलेल्या टिच्चून माऱ्याच्या बळावर दिल्ली कॅपिटल्सने ‘आयपीएल’ क्रिकेटमध्ये शनिवारी राजस्थान रॉयल्सवर ३३ धावांनी मात केली.

   या सामन्यात दिल्लीने दिलेल्या १५५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानला २० षटकांत ६ बाद १२१ धावाच करता आल्या.  कर्णधार संजू सॅमसनने एकाकी झुंज देताना नाबाद ७० धावा केल्या.  दल्लीकडून आनरिख नॉर्किएने दोन गडी बाद केले.
तत्पूर्वी, दिल्लीने २० षटकांत ६ बाद १५४ अशी धावसंख्या उभारली होती. सलामीवीर लवकर बाद झाल्यावर श्रेयस, कर्णधार ऋषभ पंत (२४) आणि शिमरॉन हेटमायर यांनी (२८) फटकेबाजी केली.


संक्षिप्त धावफलक
दिल्ली कॅपिटल्स : २० षटकांत ६ बाद १५४ (श्रेयस अय्यर ४३, शिमरॉन हेटमायर २८; मुस्ताफिझूर

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian premier league cricket on rajasthan royals match akp
First published on: 26-09-2021 at 00:00 IST