ब्रेन्डन मॅक्क्युलमच्या धुवाँदार अर्धशतकाच्या बळावर चेन्नई सुपर किंग्जने कोलकाता नाइट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात १७ षटकांत ३ बाद १४८ धावा केल्या. सलामीवीर मॅक्क्युलमने ५ चौकार आणि २ षटकारांसह ४० चेंडूंत ५६ धावा केल्या. त्याने सुरेश रैना (३१) दुसऱ्या विकेटसाठी ७० धावांची भागीदारी केली. महेंद्रसिंग धोनीने १७ चेंडूंत एक चौकार आणि एक षटकारासह नाबाद २२ धावा केल्या. पावसामुळे हा सामना एक तास ४० मिनिटे उशिराने सुरू झाला. त्यामुळे तो १७ षटकांचा करण्यात आला.