जकार्ता : भारताचे आघाडीचे खेळाडू पी. व्ही. सिंधू आणि एच. एस. प्रणॉय यांनी इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत मंगळवारी पहिल्या फेरीचा अडथळा पार करताना उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. सिंधूला गेल्या दोन स्पर्धेत पहिल्या फेरीत आव्हान गमवावे लागले होते. प्रणॉयही मलेशियातील विजेतेपदानंतर लय गमावून बसला होता.

इंडोनेशिया खुल्या या सुपर १००० दर्जाच्या मानांकन स्पर्धेत सिंधूने सलामीला ३८ मिनिटांत यजमान देशाच्या ग्रेगोरिया मरिस्का तुनजुंगचा २१-१९, २१-१५ असा पराभव केला. सिंधूचा ग्रेगोरियाविरुद्धचा पहिलाच विजय ठरला. यापूर्वी माद्रिद स्पर्धेच्या अंतिम आणि मलेशिया स्पर्धेच्या उपांत्य फेरीत सिंधूला ग्रेगोरियाकडून पराभवाचा सामना करावा लागला होता.

Ekta Day Ranveer Singh wins gold medal in steeplechase sport news
एकता डे , रणवीर सिंहला स्टीपलचेसमध्ये सुवर्ण
Indian men women team entered archery world cup 2024 finals
भारतीय तिरंदाजांची पदकनिश्चिती; पुरुष, महिला कम्पाऊंड संघ विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत; प्रथमेश, सुरेखाची चमक 
Indian Premier League Cricket Mumbai vs Chennai ipl 2024 match sport news
इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट: मुंबई-चेन्नई आमनेसामने! पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांत आज वानखेडेवर होणाऱ्या द्वंद्वात धोनीवर लक्ष
pv sindhu
सिंधूची उबर चषक बॅडमिंटन स्पर्धेतून माघार; थॉमस चषकासाठी भारताचा मजबूत संघ

पहिल्या गेममध्ये सिंधूला ग्रेगोरियाकडून चांगले आव्हान मिळाले. मात्र, सिंधूने आपल्या उंचीचा पुरेपूर वापर करून घेत ओव्हरहेड फटक्यांनी ग्रेगोरियावर वर्चस्व राखले. सिंधूने गेमच्या मध्याला ११-१० अशी आघाडी मिळवली. त्यानंतर सिंधूने सातत्याने ग्रेगोरियाला चुका करण्यास भाग पाडले आणि पहिला गेम जिंकला.

दुसऱ्या गेममध्ये मात्र सिंधूने एकतर्फी वर्चस्व राखले. सिंधूची गाठ आता तिसऱ्या मानांकित ताय त्झू यिंगशी पडणार आहे. पुरुष एकेरीत प्रणॉयने जपानच्या केंटा निशिमोटोचे आव्हान २१-६, २१-१४ असे ५० मिनिटांत सहज परतवून लावले. त्याच्यापुढे आता हाँगकाँगच्या एन्जी लॉन्ग अँगसचे आव्हान असेल.

पुरुष दुहेरीत भारताच्या सात्त्विकसाईराज रंकीरेड्डी-चिराग शेट्टीने विजयी सुरुवात करताना यजमान देशाच्या मार्कस फेर्नाल्डी गिडेऑन-केव्हिन संजया सुकुमुल्जो जोडीचा २१-१२, ११-७ असा पराभव केला. दुसऱ्या गेममध्ये प्रतिस्पर्धी जोडीने दुखापतीमुळे माघार घेतली.महिला दुहेरीत गायत्री गोपीचंद-ट्रिसा जॉली जोड़ीला पराभवाचा सामना करावा लागला. भारतीय जोडी जपानच्या रिन इवांगा-किए नाकानिशी जोडीकडून
२२-१०, १२-२१, १६-२१ अशी पराभूत झाली.