इंडोनेशिया खुली टेबल टेनिस स्पर्धा

बॅटाम (इंडोनेशिया) येथे झालेल्या ‘आयटीटीएफ’ चॅलेंज इंडोनेशिया खुल्या टेबल टेनिस स्पर्धेत भारताच्या हरमीत देसाईने विजेतेपद पटकावले. त्याने अंतिम सामन्यात भारताच्याच अमलराज अँथनीचा ३-१ असा पराभव केला.

पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात जागतिक क्रमवारीत १०४व्या स्थानावर असलेल्या हरमीतने सकारात्मक सुरुवात करताना पहिला गेम ११-९ असा जिंकला. परंतु दुसऱ्या गेममध्ये ९-११ अशी हार पत्करली. परंतु तिसऱ्या व चौथ्या गेममध्ये प्रत्येकी ११-९ अशा फरकाने अमलराजला पराभूत केले. हरमनप्रीतने उपांत्यपूर्व सामन्यात जपानच्या युटो किझिकुरीला व उपांत्य सामन्यात हाँगकाँगच्या सिऊ हँग लॅमला पराभूत केले. अमराजने उपांत्यपूर्व सामन्यात पोर्तुगालच्या जोआओ माँटेरो व उपांत्य सामन्यात इब्राहिमा डिऑवचा पराभव केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुरुष दुहेरीत हरमीत आणि अमलराज जोडीचे आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आले. हाँकगाँकच्या मॅन हू क्वान आणि सिऊ हँग लॅम जोडीने त्यांचा ३-० (११-७, ११-९, ११-९) असा पराभव केला.