India Women (IND-W) vs Australia Women (AUS-W) Live Cricket Score: आयसीसी महिला वनडे वर्ल्डकप २०२५ स्पर्धेतील दुसऱ्या सेमीफानयलचा सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये सुरू आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. दरम्यान प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या ऑस्ट्रेलियाने ४९.५ षटकांअखेर ३३८ धावा केल्या आहेत. भारतीय संघाला हा सामना जिंकण्यासाठी ३३९ धावा करायच्या आहेत. ऑस्ट्रेलियाकडून फलंदाजी करताना सलामीला आलेल्या फोबी लिचफील्डने सर्वाधिक ११९ धावांची खेळी केली. तर एलिसा पेरीने ७७ धावांची खेळी केली. शेवटी अॅशले गार्डनरने ६३ धावा केल्या.

भारतीय संघाला दुसरा सर्वात मोठा धक्का! फॉर्ममध्ये असलेली स्मृती मानधना परतली माघारी

भारतीय संघाला दुसरा सर्वात मोठा धक्का बसला आहे. संघातील प्रमुख फलंदाज स्मृती मानधना २४ धावांवर परतली माघारी

भारतीय संघाला सर्वात मोठा धक्का! शफाली वर्मा स्वस्तात परतली माघारी

भारतीय संघाला सर्वात मोठा धक्का बसला आहे. शफाली वर्मा अवघ्या १० धावा करत माघारी परतली आहे.

ऑस्ट्रेलियाचे ६ फलंदाज तंबूत

ऑस्ट्रेलियाचे ६ फलंदाज तंबूत परतले आहेत. ताहलिया मॅकग्रा ७ चेंडूत १२ धावा करून धावबाद होऊन माघारी परतली आहे. जेमिमाच्या वेगवान थ्रो मुळे तिला माघारी परतावं लागलं आहे.

टीम इंडियाचं दमदार पुनरागमन! ऑस्ट्रेलियाचा निम्मा संघ तंबूत

भारतीय संघाने दमदार पुनरागमन केलं आहे. ऑस्ट्रेलियाचा निम्मा संघ तंबूत परतला आहे.

ऑस्ट्रेलियाला चौथा धक्का! ॲनाबेल सदरलँड परतली माघारी

ऑस्ट्रेलियाला चौथा धक्का बसला आहे. ॲनाबेल सदरलँड अवघ्या ३ धावा करत माघारी परतली आहे.

ऑस्ट्रेलियाला तिसरा धक्का! बेथ मूनी परतली माघारी

ऑस्ट्रेलियाला तिसरा धक्का बसला आहे. बेथ मूनी २४ धावा करत माघारी परतली आहे.

फिबी लिचफील्डचं शतक पूर्ण! टीम इंडियाला विकेट्सची गरज

ऑस्ट्रेलियाची सलामीवीर फलंदाज फिबी लिचफील्डने ७९ चेंडूत आपलं शतक पूर्ण केलं आहे.

ऑस्ट्रेलियाच्या १५० धावा पूर्ण! टीम इंडियाला विकेट्सची गरज

ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी २३ व्या षटकात १५० धावांचा पल्ला गाठला आहे.

ऑस्ट्रेलियाच्या १०० धावा पूर्ण

पहिल्या डावात फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने १०० धावा पूर्ण केल्या आहेत.

भारताची प्लेईंग इलेव्हन

शफाली वर्मा, स्मृती मानधना, अमनजोत कौर, जेमिमाह रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर (कर्णधार), दीप्ती शर्मा, रिचा घोष (यष्टीरक्षक), राधा यादव, क्रांती गौड, श्री चरणी, रेणुका सिंग ठाकूर

ऑस्ट्रेलियाची प्लेईंग इलेव्हन

फिबी लिचफील्ड, ॲलिसा हिली (यष्टीरक्षक/कर्णधार), एलिस पेरी, बेथ मूनी, ॲनाबेल सदरलँड, ॲशले गार्डनर, ताहलिया मॅकग्रा, सोफी मोलिन्यू, अलाना किंग, किम गार्थ, मेगन शूट

नाणेफेक

महिला वनडे वर्ल्डकप २०२५च्या उपांत्य सामन्याची नाणेफेक ऑस्ट्रेलियाने जिंकली आहे आणि प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. तर भारतीय संघ गोलंदाजीने सामन्याला सुरूवात करणार आहे. भारताच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये ३ मोठे बदल करण्यात आले आहेत. क्रांती गौड, रिचा घोष व शफाली वर्मा या तीन खेळाडू संघात परतल्या आहेत. उमा छेत्री व हरलीन देओल यांना बाहेर जावं लागलं आहे. तर जॉर्जिया वेयरहमच्या जागी सॉफी मॉलिन्यू प्लेईंग इलेव्हनमध्ये परतली आहे.

भारताची प्लेईंग इलेव्हन

भारताच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये प्रतिका रावलच्या रूपात मोठा बदल दिसून येणार आहे. प्रतिका रावलला बांगलादेशविरूद्ध सामन्यात पायाला दुखापत झाली होती. या दुखापतीमुळे विश्वचषकातील उर्वरित सामन्यांमधून बाहेर पडली आहे. तिच्या जागी शफाली वर्माला संधी देण्यात आली आहे.

भारत-ऑस्ट्रेलिया सेमीफायनल

महिला वनडे विश्वचषक २०२५ मधील दुसरा उपांत्य सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळवला जात आहे. ऑस्ट्रेलियाने या स्पर्धेत एकही सामना गमावलेला नाही. तर भारतीय संघाला गट टप्प्यात तीन पराभवांना सामोरं जावं लागलं. ज्यामध्ये ऑस्ट्रेलियानेही भारताला पराभूत केलं होतं.