जनता सहकारी बँकेने आंतर बँक क्रिकेट स्पर्धेत बोनस गुणांसह विजय मिळविला. त्यांनी कोटक महिंद्रा बँकेचा सात गडी राखून पराभव केला. अन्य लढतीत विश्वेश्वर बँकेने सेन्ट्रल बँकेवर सात गडी राखून मात केली.
प्रथम फलंदाजी करताना कोटक बँकेने २० षटकांत ९ बाद १३२ धावा केल्या. त्यामध्ये त्यांच्याकडून अनीष देशपांडे याने सर्वाधिक नाबाद २२ धावा केल्या. जनता बँकेने १५.४ षटकांत १३५ धावा करीत विजय मिळविला. त्यावेळी त्यांच्याकडून अजिंक्य पाटील याने शैलीदार खेळ करीत ५१ धावा केल्या. तिमोटी वाघमारे याने ३४ धावा करीत त्याला दमदार साथ दिली.
जयदीप नरसे याने आकर्षक ४८ धावा करुनही सेन्ट्रल बँकेस निर्धारित २० षटकांत ७ बाद १५२ धावांपर्यंत मजल गाठता आली. विश्वेश्वर बँकेने विजयासाठी असलेले १५३ धावांचे लक्ष्य १८.५ षटकांत पार केले, त्याचे श्रेय गौरव गणपुले याने केलेल्या ८१ धावांना द्यावे लागेल.
संक्षिप्त निकाल-१. कोटक महिंद्रा बँक-९ बाद १३२ (अनीष देशपांडे नाबाद २२, वैभव बडवे ५/१९, अजिंक्य पाटील २/२३, आनंद माने २/२१) पराभूत वि. जनता सहकारी बँक-१५.४ षटकांत ३ बाद १३५ (अजिंक्य पाटील ५१, तिमोटी वाघमारे ३४)
२. सेन्ट्रल बँक-७ बाद १५२ (जयदीप नरसे ४८, संजय कोंढाळकर २२, निखिल वाघ २/२९, योगेश डोंगरे २/३१) पराभूत वि. विश्वेश्वर बँक-३ बाद १५३ (गौरव गणपुले ८१, योगेश डोंगरे २१, दीपक रामफले २/२०)