इंटर मिलानची स्पालवर मात

इंटर मिलानने उत्तरार्धात केलेल्या दोन गोलच्या बळावर त्यांनी स्पालवर २-० अशी मात केली.

(संग्रहित छायाचित्र)

सेरी ए लीग फुटबॉल स्पर्धा

इंटर मिलानने उत्तरार्धात केलेल्या दोन गोलच्या बळावर त्यांनी स्पालवर २-० अशी मात केली. त्यामुळे पुढील आठवडय़ात एसी मिलानविरुद्ध होणाऱ्या सामन्यापूर्वी इंटर मिलानचे खेळाडू लयीत परतले आहेत.

इंटर मिलान आणि स्पालकडून पूर्वार्धात एकमेकांविरुद्ध अनेकदा आक्रमणे झाली. मात्र, दोन्ही संघांना एकही गोल करता आला नाही. उत्तरार्धात मॅट्टेओ पोलिटॅनो आणि रॉबटरे गागलिआर्डिनी यांनी अनुक्रमे ६७ आणि ७७ व्या मिनिटाला गोल करीत संघाला विजय मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली. या विजयासह इंटर मिलानचा संघ एसी मिलाननंतर चौथ्या स्थानावर आहे. सिरी एमधील सर्वोच्च चार स्थानांवरील संघ चॅम्पियन्स लीगला पात्र होणार असल्याने पुढेही चांगली कामगिरी करावी लागणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Inter milan over the spell

ताज्या बातम्या