Vinesh Phogat Disqualified : वजन वाढल्यामुळे महिलांच्या ५० किलो वजनी गटातून कुस्तीपटू विनेश फोगट हिला अपात्र ठरवण्यात आले आहे. या निर्णायामुळे सुवर्णपदक जिंकण्याचं भारताचं स्वप्नही भंगलं आहे. दरम्यान, या निर्णयानंतर आता सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. या निर्णयामागे कुठं तरी षडयंत्र असल्याचा आरोप काही नेटकऱ्यांनी केला आहे.

नेमकं काय म्हणाले नेटकरी?

“विनेश फोगट हिला अपात्र ठरवल्यानंतर नेटकऱ्यांनी एक्स या समाजमाध्यमावर संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. ऑलिम्पिकमध्ये एक पुरुष महिला गटातून खेळू शकतो. मात्र विनेश १०० ग्रॅम वजन वाढलं तर खेळू शकत नाही. यात मला कुठतरी षडयंत्र दिसत आहे. भारतीय ऑलिम्पिक समितीने या निर्णयाला आव्हान द्यायला हवं, अशी प्रतिक्रिया एका यूजरने दिली आहे. तसेच हा विनेशचा नाही, तर भारताचा अपमान आहे”, असेही तो म्हणाला.

Leader of Opposition in Lok Sabha and Congress MP Rahul Gandhi and party General Secretary Priyanka Gandhi Vadra
Ujjain Rape News: उज्जैनमधील उघड्यावर बलात्कार प्रकरण मानवतेला कलंक; राहुल गांधी, प्रियांका गांधींनी व्यक्त केला संताप
SYMBIOSEXUAL
तुम्ही सुद्धा ‘Symbiosexual’ आहात का? ही नवीन लैंगिक ओळख नेमकी काय आहे? इंटरनेटवर याची इतकी चर्चा का?
Success Story Of Karnati Varun Reddy
Success Story : वडिलांच्या इच्छापूर्तीसाठी UPSC च्या मार्गाची निवड; पहिल्यांदा अपयश अन्… ; वाचा आयएएस अधिकाऱ्याची ‘ही’ गोष्ट
Sanjay Manjrekar brually trolled by fans
Duleep Trophy 2024 : रोहित-विराट, बुमराहच्या विश्रांतीवर प्रश्न उपस्थित करणाऱ्या माजी खेळाडूला चाहत्यांचे चोख प्रत्युत्तर; म्हणाले…
Like Pooja Khedkar 359 candidates grabbed the job
पूजा खेडकरप्रमाणे ३५९ उमेदवारांनी बळकावली नोकरी… आता फेरतपासणीत…
japan flights cancel
‘या’ देशात एक कात्री गायब झाल्याने ३० हून अधिक उड्डाणे रद्द; नेमकं प्रकरण काय?
Former mayor of Badlapur Vaman Mhatre expressed his anger on a female reporter who covered the Badlapur rape incident
Badlapur School Case : वामन म्हात्रे यांची आधी वादग्रस्त टिप्पणी, नंतर सारवासारव
kolkata rape case
Kolkata Rape Case : पीडितेची ओळख उघड केल्याप्रकरणी विद्यार्थिनीला अटक; ममता बॅनर्जींविरोधातही आक्षेपार्ह टीप्पणी!

हेही वाचा – विनेश फोगट पॅरिस ऑलिम्पिकमधून अपात्र ठरल्यानंतर पंतप्रधान मोदींची प्रतिक्रिया; म्हणाले…

याशिवाय अन्य एका यूजरनेही, हा निर्णय म्हणजे अप्रामाणिकपणाची मर्यादा ओलांडल्याचा प्रकार असल्याची संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. “एक पुरुष महिला म्हणून खेळू शकतो. पण विनेश विश्वविजेत्याचा पराभव करूनही खेळू शकत नाही, कारण काय, तर फक्त तिचं वजन १०० ग्रॅमने वाढल म्हणून. आज ऑलिम्पिकमध्ये अप्रामामिकपणाच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत”, असे तो म्हणाला.

अन्य एक यूजर म्हणाला, “विनेशचं अशाप्रकारे अपात्र ठरणं, हा एक योगायोग आहे की षडयंत्र? विनेश देशातील सिस्टीमशी लढून ऑलिम्पिकपर्यंत पोहोचली. मात्र, तिथेही ती अपात्र ठरली. मला यात काही तरी गडबड दिसत आहे”. तर आणखी एक यूजर म्हणाला, “हा विनेशचा नाही, तर संपूर्ण भारताचा अपमान आह. विनेश फोगट आज इतिहास रचणार होती. त्यापूर्वी १०० ग्रॅम वजय वाढलं म्हणून तिला अपात्र घोषित करण्यात आलं. हा तिच्यावर झालेला अन्याय आहे. संपूर्ण देश आज विनेशच्या पाठिशी उभा आहे. भारतीय ऑलिम्पिक समितीने या निर्णयाला आव्हान द्यायला हवं.”

भारतीय ऑलिम्पिक समितीची प्रतिक्रिया

दरम्यान, भारतीय ऑलिम्पिक समितीनेही परिपत्रक जारी करत यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. ‘कुस्तीपटू विनेश फोगट ५० किलो वजनी गटात अपात्र ठरली आहे. भारतीय पथकासाठी ही अतिशय निराशाजनक आणि दुर्देवी गोष्ट’, असं भारतीय ऑलिम्पिक समितीने म्हटलं आहे. याशिवाय भारतीय चमूने रात्रभरात तिच्या वजनासंदर्भात सर्वोत्तम प्रयत्न केले. मात्र सकाळी केलेल्या वजन चाचणीत तिचे वजन ५० किलोग्रॅमपेक्षा जास्त असल्याचं स्पष्ट झालं आहे. भारतीय पथक यासंदर्भात याव्यतिरिक्त काहीही भाष्य करणार नाही. विनेशच्या खाजगीपणाचा अधिकार जपावा अशी विनंती भारतीय ऑलिम्पिक समितीने केली आहे.

हेही वाचा – “वजन कमी केलं तरी तोंडावर कंट्रोल…”, अपात्र ठरल्यानंतर विनेश फोगटबाबत हिंदकेसरी दीनानाथ सिंगे काय म्हणाले?

महत्त्वाचे म्हणजे मंगळवारी विनेश फोगटने महिलांच्या ५० किलो वजनी गटातील कुस्तीच्या राऊंड ऑफ १६ च्या सामन्यात जपानच्या युई सुसाकीचा ३-२ असा पराभव करत अंतिम फेरीत धडक दिली होती.