भारतीय ऑलिम्पिक महासंघाने (आयओए) आगामी निवडणुकीत आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या (आयओसी) नियमावलींचा उपयोग केला नाही तर महासंघावर बंदीची कारवाई करण्याचा इशारा आयओसीने आयओएला दिला आहे. ५ डिसेंबर रोजी आयओएची निवडणूक होणार आहे.
आयओएची निवडणूक केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने दिलेल्या तरतुदीनुसार होण्याची शक्यता आहे. केंद्र शासनाच्या शिफारसींनुसार निवडणूक घेण्यास आयओएचा जरी विरोध असला तरी त्याच शिफारसींचा उपयोग आगामी निवडणुकीत केला जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र त्या पद्धतीने निवडणूक घेणे हे आयओसीच्या नियमावलींचा भंग होईल व तसे झाल्यास आयओएला बंदीच्या नामुष्कीस तोंड द्यावे लागेल, अशा आशयाचे पत्र आयओसीचे अध्यक्ष जॅक्वीस रॉज व आशियाई ऑलिम्पिक महासंघाचे अध्यक्ष शेख अहमद अल फहाद अल सबाह यांनी आयओएचे प्रभारी अध्यक्ष विजयकुमार मल्होत्रा व सरचिटणीस रणधीरसिंग यांना लिहिले आहे.
आयओसीने आता पत्र लिहिल्यामुळे आगामी निवडणुकीत आयओसीच्या घटनेचा आदर करणे अनिवार्य असल्यामुळे आयओएचे पदाधिकारी संभ्रमात पडले आहेत. आयओसीच्या नियमावलीनुसारच निवडणूक घेतली जाईल अशी हमी आयओएने आयओसीकडे पाठविण्याचे बंधनकारक करण्यात आले आहे. जर ३० नोव्हेंबपर्यंत ही हमी मिळाली नाही तर ४ व ५ डिसेंबर रोजी आयओसीच्या कार्यकारिणीच्या बैठकीत आयओएवरील बंदीचा प्रस्ताव ठेवला जाईल. आयओसीच्या नियम २७.९ व ५९.१.४ नुसार ही कारवाई केली जाईल. असेही रॉज व शेख यांनी कळविले आहे. आयओएने केंद्रीय क्रीडामंत्रालयाच्या शिफारसींची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे, मात्र त्यास आयओसीने सुरुवातीपासून विरोध दर्शविला आहे.
संग्रहित लेख, दिनांक 24th Nov 2012 रोजी प्रकाशित
आयओएवर बंदीची कारवाई करण्याचा आयओसीचा इशारा
भारतीय ऑलिम्पिक महासंघाने (आयओए) आगामी निवडणुकीत आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या (आयओसी) नियमावलींचा उपयोग केला नाही तर महासंघावर बंदीची कारवाई करण्याचा इशारा आयओसीने आयओएला दिला आहे. ५ डिसेंबर रोजी आयओएची निवडणूक होणार आहे.

First published on: 24-11-2012 at 03:29 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ioc gives insinuation take action to ban on ioa