IPL 2017, MI vs DD: मुंबईचा दिल्लीवर १४ रन्सने विजय, मिचेल मॅक्लेनगन सामनावीर

मॅचचे लेटेस्ट अपडेट्स

ipl 2017, live cricket score, ipl live score, mi vs dd, mumbai vs delhi, mumbai indians vs delhi daredevils, marathi news, marathi, Marathi news paper, Marathi news online, Marathi Samachar, Marathi latest news,news, entertainment marathi news, Bollywood news, Sports news in marathi, Health news, political news in marathi,breaking news,marathi batmya
मॅचचे लेटेस्ट अपडेट्स

दिल्लीपुढे मुंबईने १४३ चं माफक आव्हान ठेवल्यावरही मॅच मुंबईने जिंकण्याचा पराक्रम केला आहे. दिल्ली डेअरडेव्हिल्सच्या ५० च्या आधीच ६ विकेट्स गेल्या होत्या. आदित्य तरे, संजू सॅमसन, श्रेयस अय्यर, कोरी अँडरसन, ऋषभ पंत आणि करूण नायर पॅव्हेलियनमध्ये परतले. मॅचवर मुंबईची घट्ट पकड असताना राबाडा आणि माॅरिसने ९१ रन्सची भागीदारी करत मॅचमध्ये दिल्लीचं आव्हान कायम ठेवलं. पण शेवटी मुंबई इंडियन्सच्या झंझावातापुढे दिल्ली डेअरडेव्हिल्सला हार पत्करावी लागली

आज मुंबईची बॅटिंग त्यांच्या लौकिकाला साजेशी मुळीच झाली नाही.  मुंबईच्या बॅट्समन्सना काहीच छाप पाडता आली नाही. पार्थिव पटेल आणि जाॅस बटलरची विकेट पडल्यानंतर टप्प्याटप्प्याने मुंबई इंडियन्सच्या विकेट पडत गेल्या. मुंबईने कशीबशी १४२ रन्सपर्यंत मजल मारली आहे. पण दिल्लीच्या झटपट विकेट्स काढून मुंबईने मॅच आपल्या खिशात टाकली

आयपीएलच्या मोसमाची सुरूवात पराभवाने करणाऱ्या मुंबई इंडियन्सनी नंतर सलग विजय मिळवत गुणतालिकेत अव्वल स्थान मिळवलं. आपलं अव्वल स्थान कायम ठेवलं आहे. डेअरडेव्हिल्सची बॅटिंग संथ होत असल्याती टीका त्यांच्यावर होत आहे.

सामनावीर- मिचेल मॅक्लेनगन

 

LIVE UPDATES:

२३:४४- मुंबईचा दिल्लीवर १४ रन्सने विजय

११:३८- राबाडा आऊट, दिल्ली ११५-७

११:३४- माॅरिसचा आक्रमक सिक्सर, १२ बाॅल्समध्ये ३० रन्स हव्या

११:२९- राबाडा आणि माॅरिसने दिल्ली डेअरडेव्हिल्सचा डाव काहीसा सावरला.

१०:५६- राबाडाने मारला सिक्स

१०:५४- ख्रिस माॅरिसचे काही चौकार

१०:४३- मॅचमध्ये मुंबईचा डंका, डेअरडेव्हिल्स २४-६, करूण नायर क्लीनबोल्ड

२२:१५- डेअरडेव्हिल्सच्या दोन झटपट विकेट्स पडल्या, १४-२

९:४५-  २० ओव्हर्समध्ये मुंबई इंडियन्सचे १४२-८

९:३५- कायरन पाॅलार्ड आऊट, मुंबई १२०-६

९:२७-  हार्दिक पंड्याचा मोठा सिक्सर मुंबई ११६-५

९:१५- १०० च्या आधीच मुंबईचा निम्मा संघ पॅव्हेलियनमध्ये, ८८-५

८:४९- मुंबईची स्थिती डळमळीत, राणापाठोपाठ रोहित शर्मा आऊट, मुंबई ६०-४

८:४३ – मुंबईची तिसरी विकेट, नितीश राणा झेलबाद, मुंबई ५६-३

८:००- पार्थिव पटेल क्लीन बोल्ड, मुंबई ३७-१

८:१०- मुंबईच्या जाॅस बटलरचा दणदणीत सिक्सर

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Ipl 2017 live cricket score mumbai indians vs delhi daredevils mi vs dd

ताज्या बातम्या