आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. गेली १० वर्ष मुंबई इंडियन्स संघाच्या गोलंदाजीची धुरा सांभाळणारा श्रीलंकेचा जलदगती गोलंदाज लसिथ मलिंगा यंदा नवीन भूमिकेत दिसणार आहे. अकराव्या हंगामासाठी झालेल्या लिलावात मुंबईने मलिंगावर बोली लावली नव्हती, मात्र अकराव्या हंगामासाठी मुंबई इंडियन्स संघ व्यवस्थापनाने लसिथ मलिंगाला गोलंदाजी मार्गदर्शक म्हणून संघात समाविष्ट करुन घेतलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अवश्य वाचा –  कोलकाता नाईट रायडर्सच्या कर्णधारपदासाठी रॉबिन उथप्पाचं नाव शर्यतीत

मलिंगा संघात मार्गदर्शकाच्या भूमिकेत येत असल्यामुळे त्याचा इतर तरुण गोलंदाजांना फायदा होईल असं मुंबई इंडियन्सचे मालक आकाश अंबानी यांनी स्पष्ट केलं आहे. मुख्य प्रशिक्षक महेला जयवर्धने, गोलंदाजी प्रशिक्षक शेन बाँड, फलंदाजी प्रशिक्षक रॉबिन सिंह आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक जेम्स पेमेंट यांच्यासह मलिंगाही मुंबईच्या गोलंदाजांना आपल्या टिप्स देताना दिसणार आहे. दहाव्या हंगामात रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबईने पुण्यावर मात करत स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं होतं. त्यामुळे यंदा नवीन हंगामात नवीन खेळाडू आणि प्रशिक्षकांसह मुंबईचा संघ कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

अवश्य वाचा – चेन्नई सुपरकिंग्जने डावलल्यामुळे रविचंद्रन आश्विन नाराज

मराठीतील सर्व आयपीएल २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2018 lasith malinga back in mumbai indians squad but as a bowling mentor
First published on: 07-02-2018 at 21:28 IST