आयपीएलमध्ये सर्वाधिक शतकं झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत विराट कोहली दुसऱ्या स्थानावर पोहचला आहे. कोहलीचं आयपीएलमधलं हे पाचवं शतक ठरलं आहे. कोहलीने डेव्हिड वॉर्नर, शेन वॉटसन, एबी डिव्हीलियर्स यांना मागे टाकलं आहे. या यादीत ख्रिस गेल हा विराटच्या पुढे आहे. गेलच्या नावावर ६ शतकं जमा आहेत.
Most IPL centuries:
6 Gayle
5 KOHLI
4 Warner, Watson
3 ABD#KKRvRCB— Bharath Seervi (@SeerviBharath) April 19, 2019
दरम्यान, कोहलीचं आक्रमक शतक आणि मोईन अलीने केलेल्या अर्धशतकी खेळाच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाने २१३ धावांपर्यंत मजल मारली. कोलकात्याच्या इडन गार्डन्स मैदानावर बंगळुरुच्या फलंदाजांनी आश्वासक फलंदाजी केली. मोईन अलीने ६६ तर कर्णधार विराट कोहलीने ५८ चेंडूत १०० धावांची खेळी केली. विराट कोहली आणि मोईन अली यांनी तिसऱ्या विकेटसाठी धडाकेबाज अर्धशतकी भागीदारी रचली. दोन्ही फलंदाजांनी कोलकात्याच्या गोलंदाजीचा समाचार घेतला. या भागीदारीमुळेच बंगळुरुने आजच्या सामन्यात आश्वासक धावसंख्येचा पल्ला गाठला.