IPL 2019 RR vs RCB Updates : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील लढतीत राजस्थानने बंगळुरूवर ७ गडी राखून मात केली. बंगळुरूने प्रथम फलंदाजी करत ४ बाद १५८ धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना सलामीवीर जोस बटलर याच्या अर्धशतकाच्या (५९) बळावर राजस्थानने सामना जिंकला आणि अखेर IPL मध्ये आपले पहिले २ गुण कमावले. बंगळुरुच्या संघाला मात्र अद्याप स्पर्धेत आपले खाते उघडता आलेले नाही.

१५९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानच्या सलामीवीरांनी धडाकेबाज सुरुवात केली. अजिंक्य रहाणे आणि जोस बटलर यांच्या फटकेबाजीमुळे सहाव्या षटकातच राजस्थानने अर्धशतक गाठले. पण कर्णधार अजिंक्य रहाणेला मोठी खेळी करता आली नाही. तो २० चेंडूत २२ धावा करून पायचीत झाला. या खेळीत त्याने ४ चौकार खेचले. जोस बटलरने मात्र आपली फटकेबाजी सुरूच ठेवली आणि दमदार अर्धशतक केले आणि राजस्थानच्या विजयाचा पाया रचला. पण फटकेबाजी करण्याच्या प्रयत्नात बटलर बाद झाला. त्याने ४३ चेंडूत ५९ धावा केल्या. यात ८ चौकार आणि १ षटकार समाविष्ट होता. स्टीव्ह स्मिथने फटकेबाजी करण्याचा प्रयत्न केला, पण तो लवकर बाद झाला. त्याने ३१ चेंडूत ३८ धावा केल्या. अखेर राहुल त्रिपाठीने षटकार मारून सामना जिंकवला. त्याने २३ चेंडूत ३४ धावा केल्या. यात ३ चौकार आणि १ षटकार समाविष्ट होता.

त्याआधी, प्रथम फलंदाजी करताना विराट आणि पार्थिव पटेल यांनी बंगळुरूच्या डावाला चांगली सुरुवात करून दिली. पण श्रेयस गोपालच्या गोलंदाजीवर चाचपडत खेळणारा बंगळुरूचा कर्णधार विराट कोहली अखेर त्रिफळाचीत झाला. विराटने २५ चेंडूत २३ धावा केल्या. त्यात ३ चौकारांचा समावेश होता. खेळपट्टीवर स्थिरावण्याचा प्रयत्न करणाऱ्या एबी डीव्हिलियर्सचा श्रेयस गोपाळने स्वतःच्याच गोलंदाजीवर अप्रतिम झेल टिपला आणि बंगळुरूला दुसरा धक्का बसला. डीव्हिलियर्सने ९ चेंडूत २ चौकारांसह १३ धावा केल्या. बंगळुरूच्या धोकादायक फलंदाज शिमरॉन हेटमायर झेलबाद झाला आणि बंगळुरूला तिसरा धक्का बसला. त्याने ९ चेंडूत १ धाव केली. श्रेयस गोपाळने बंगळुरूविरुद्ध अप्रतिम गोलंदाजी करत पहिल्या ३ षटकात ८ धावा देऊन ३ बळी टिपले. त्याने विराट कोहली (२३), एबी डीव्हिलियर्स (१३) आणि शिमरॉन हेटमायर (१) या तिघांना माघारी धाडले.

एकीकडे बंगळुरूचे महत्वाचे खेळाडू बाद होत असताना पार्थिव पटेलने मात्र २९ चेंडूत संयमी खेळी करत आपले अर्धशतक पूर्ण केले. पण संयमी अर्धशतकी खेळी करणारा पार्थिव पटेल मोठा फटका खेळताना झेलबाद झाला आणि बंगळुरूला चौथा धक्का बसला. त्याने ४१ चेंडूत ६७ धावा केल्या. यात ९ चौकार आणि १ षटकाराचा समावेश होता. अखेर मार्कस स्टॉयनीसच्या नाबाद ३१ आणि मोईन अलीच्या नाबाद १८ धावांच्या फटकेबाजीमुळे २० षटकात बंगळुरूने ४ बाद १५८ धावांची मजल मारली.

Live Blog

23:37 (IST)02 Apr 2019
‘रॉयल’ लढतीत राजस्थानची बंगळुरूवर मात

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील लढतीत राजस्थानने बंगळुरूवर ७ गडी राखून मात केली. जोस बटलर याच्या अर्धशतकाच्या (५९) बळावर राजस्थानने सामना जिंकला आणि अखेर IPL मध्ये आपले पहिले २ गुण कमावले. बंगळुरुच्या संघाला मात्र अद्याप स्पर्धेत आपले खाते उघडता आलेले नाही. 

23:11 (IST)02 Apr 2019
अर्धशतकवीर बटलर बाद; राजस्थानला दुसरा धक्का

फटकेबाजी करण्याच्या प्रयत्नात बटलर बाद झाला. त्याने ४३ चेंडूत ५९ धावा केल्या. यात ८ चौकार आणि १ षटकार समाविष्ट होता.

22:44 (IST)02 Apr 2019
राजस्थानच्या बटलरचे दमदार अर्धशतक

जोस बटलरने मात्र आपली फटकेबाजी सुरूच ठेवली आणि दमदार अर्धशतक केले आणि राजस्थानच्या विजयाचा पाया रचला.

22:28 (IST)02 Apr 2019
अजिंक्य रहाणे पायचीत; राजस्थानला पहिला धक्का

कर्णधार अजिंक्य रहाणेला मोठी खेळी करता आली नाही. तो २० चेंडूत २२ धावा करून पायचीत झाला. या खेळीत त्याने ४ चौकार खेचले.

22:17 (IST)02 Apr 2019
राजस्थानची धडाकेबाज सुरुवात; सहाव्या षटकात अर्धशतक

१५९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानच्या सलामीवीरांनी धडाकेबाज सुरुवात केली. अजिंक्य रहाणे आणि जोस बटलर यांच्या फटकेबाजीमुळे सहाव्या षटकातच राजस्थानने अर्धशतक गाठले.

21:35 (IST)02 Apr 2019
पार्थिव पटेलचे अर्धशतक; राजस्थानपुढे १५९ धावांचे आव्हान

पार्थिव पटेलचे अर्धशतक (६७) आणि मार्कस स्टॉयनीस (३१*) – मोईन अली (१८*) यांची शेवटच्या षटकांतील फलंदाजी यांच्या जोरावर २० षटकात बंगळुरूने ४ बाद १५८ धावांची मजल मारली अणि  राजस्थानपुढे १५९ धावांचे आव्हान ठेवले आहे.

21:22 (IST)02 Apr 2019
अर्धशतकवीर पार्थिव पटेल झेलबाद; बंगळुरूला चौथा धक्का

संयमी अर्धशतकी खेळी करणारा पार्थिव पटेल मोठा फटका खेळताना झेलबाद झाला आणि बंगळुरूला चौथा धक्का बसला. त्याने ४१ चेंडूत ६७ धावा केल्या. यात ९ चौकार आणि १ षटकाराचा समावेश होता.

21:02 (IST)02 Apr 2019
पार्थिव पटेलचे २९ चेंडूत संयमी अर्धशतक

एकीकडे बंगळुरूचे महत्वाचे खेळाडू बाद होत असताना पार्थिव पटेलने मात्र २९ चेंडूत संयमी खेळी करत आपले अर्धशतक पूर्ण केले.

20:59 (IST)02 Apr 2019
श्रेयस गोपाळची अप्रतिम गोलंदाजी; ८ धावांत टिपले ३ बळी

श्रेयस गोपाळने बंगळुरूविरुद्ध अप्रतिम गोलंदाजी करत पहिल्या ३ षटकात ८ धावा देऊन ३ बळी टिपले. त्याने विराट कोहली (२३), एबी डीव्हिलियर्स (१३) आणि शिमरॉन हेटमायर (१) या तिघांना माघारी धाडले.

20:45 (IST)02 Apr 2019
धोकादायक हेटमायर झेलबाद; बंगळुरूला तिसरा धक्का

बंगळुरूच्या धोकादायक फलंदाज शिमरॉन हेटमायर झेलबाद झाला आणि बंगळुरूला तिसरा धक्का बसला. त्याने ९ चेंडूत १ धाव केली.

20:35 (IST)02 Apr 2019
गोपाळने घेतला डीव्हिलियर्सचा अप्रतिम झेल; बंगळुरूला दुसरा धक्का

खेळपट्टीवर स्थिरावण्याचा प्रयत्न करणाऱ्या एबी डीव्हिलियर्सचा श्रेयस गोपाळने स्वतःच्याच गोलंदाजीवर अप्रतिम झेल टिपला आणि बंगळुरूला दुसरा धक्का बसला. डीव्हिलियर्सने ९ चेंडूत २ चौकारांसह १३ धावा केल्या.

20:25 (IST)02 Apr 2019
विराट त्रिफळाचीत; बंगळुरूला पहिला धक्का

विराट आणि पार्थिव पटेल यांनी बंगळुरूच्या डावाला चांगली सुरुवात करून दिली. पण श्रेयस गोपालच्या गोलंदाजीवर चाचपडत खेळणारा बंगळुरूचा कर्णधार विराट कोहली अखेर त्रिफळाचीत झाला. विराटने २५ चेंडूत २३ धावा केल्या. त्यात ३ चौकारांचा समावेश होता.

20:11 (IST)02 Apr 2019
राजस्थानच्या संघात २; बंगळुरूच्या संघात ३ बदल

राजस्थानच्या संघात स्टुअर्ट बिन्नी आणि वरुण ऍरॉन याला संधी देण्यात आली आहे. तर बंगळुरूच्या संघाने मार्कस स्टॉयनीस, नवदीप सैनी आणि अक्षदीप नाथ यांना संघात स्थान दिले आहे.

19:49 (IST)02 Apr 2019
नाणेफेक जिंकून राजस्थानची प्रथम गोलंदाजी

राजस्थानचा कर्णधार अजिंक्य रहाणे याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली आहे. फलंदाजीत फारशी कमाल न दाखवू शकलेला विराटचा बंगळुरू संघ प्रथम फलंदाजी करताना किती धावा करतो हे पाहणे औत्सुक्याचे आहे.