IPL 2019 : भारतात एप्रिल-मे दरम्यान लोकसभा निवडणुका होणार असल्या तरी IPL चे सर्व सामने हे भारतातच होणार आहेत. आज BCCIच्या प्रशासकीय समिती (CoA) ची दिल्लीमध्ये बैठक झाली. त्यानंतर ही माहिती देण्यात आली. २३ मार्चपासून हा स्पर्धेचा थरार रंगणार असल्याचे सांगितले जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रशासकीय समितीच्या सदस्यांची आज नवी दिल्ली येथे बैठक झाली. या बैठकीदरम्यान IPL सामन्यांची ठिकाणे आणि वेळापत्रक याबाबत चर्चा झाली. या बैठकीतील प्राथमिक चर्चेनंतर विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार IPL स्पर्धा ही भारतातच खेळवली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यासह या स्पर्धेच्या वेळापत्रकाबाबतही चर्चा करण्यात आली असून २३ मार्च २०१९ पासून या स्पर्धेचा थरार रंगणार असल्याचे समजत आहे. या संदर्भात CoA इतर समभागधारकांशी चर्चा करणार असून त्यानंतर याबाबत तपशीलवार माहिती देण्यात येणार आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2019 to be played in india despite general elections
First published on: 08-01-2019 at 17:02 IST