भारताचा माजी वेगवान गोलंदाज जहीर खान याला मुंबई इंडियन्स संघाच्या Director of Cricket Operations (कार्यकारी संचालक) पदी नियुक्त करण्यात आले आहे. मुंबई इंडियन्स संघाने ट्विटरवरून याबाबत च्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 

९२ कसोटी आणि २०० एकदिवसीय सामान्यांचा दांडगा अनुभव असणाऱ्या जहीर खानने मुमबी इंडियन्स संघाचे प्रतिनिधित्व केले होते. आता या वर्षी मात्र तो सपोर्ट स्टाफच्या भूमिकेत दिसणार आहे.

जहीर खान हा दिल्ली डेअरडेव्हिल्स संघात कर्णधार आणि मेंटॉरच्या भूमिकेत होता. पण २०१८ साली त्याने IPL न खेळण्याचा घेतला. मात्र या वर्षी तो पुन्हा एकदा IPL मध्ये दिसणार असून तो सपोर्ट स्टाफच्या भूमिकेत मुंबईच्या संघाला सहकार्य करणार आहे. तसेच मुंबई इंडियन्सकडून तो IPL auction 2019 मध्ये सक्रिय सहभाग घेताना दिसणार आहे.

 

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2019 zaheer khan appointed as director of cricket operations for mumbai indians
First published on: 18-12-2018 at 15:13 IST