आयपीएल (IPL 2020) च्या १३ व्या सत्राला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. त्याआधीच चकित करणाऱ्या बातम्या येऊ लागल्या आहेत. चेन्नई सुपर किंग्‍स (Chennai Super Kings) चा स्टार खेळाडू सुरेश रैनाने (Suresh Raina) आयपीएलमधून माघार घेतली असून भारतात परतला आहे. ही बातमी ताजी असतानाच आता विराट कोहलीच्या नेतृ्त्वाखालीलली रॉयल चैलेंजर्स बँगलोर (Royal Challengers Bangalore) संघालाही झटका बसला आहे.

आरसीबीचा स्‍टार गेंदबाज केन रिचर्ड्सन (kane Richardson ) आयपीएलमधून बाहेर पडला आहे. यामागे कौटंबीक कारण असल्याचं सांगितलं जात आहे. आरसीबीने ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे. ट्विटमध्ये आरसीबीनं सांगितलेय की, रिचर्ड्सन लवकरच बाप होणार आहे. त्यामुळे तो कुटुंबासोबत वेळ घालवू इच्छितोय. त्यामुळेच त्यानं आयपीएलमधून माघार घेतली आहे.

रिचर्ड्सनच्या जागी आरसीबीनं ऑस्ट्रेलियाचा लेग स्पिनर एडम जम्‍पाला आपल्या ताफ्यात घेतलं आहे. २८ वर्षीय रिचर्ड्सन २०१६ मध्ये आरसीबीसोबत जोडला होता. २०२० मध्ये झालेल्या लिलावात आरसीबीनं पुन्हा एकदा त्याच्यासोबत करार केला होता. आरसीबीनं २०२०मध्ये झालेल्या करारात रिचर्ड्सनला चार कोटी रुपयात खरेदी केलं होतं. तर जम्पा या लिलावात अनसोल्ड राहिला होता. त्याची बेस प्राइस १.५ कोटी रुपये होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जंप्माच्या समावेशामुळे आरसीबीचा फिरकी विभाग मजबूत झाला आहे. संघाकडे आधीपासूनच युजवेंद्र चहल, मोइन अली आणि पवन नेगीसारखे दर्जेदार गोलंदाज आहेत.