आयपीएलमध्ये मंगळवारी झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने पंजाब किंग्सचा दोन धावांनी पराभव करत निसटता विजय मिळवला. अखेरच्या ओव्हरमध्ये पंजाबला जिंकण्यासाठी फक्त चार धावांची गरज असताना कार्तिक त्यागीने जबरदस्त गोलंदाजी करत संघाला विजय मिळवून दिला. दरम्यान सामना जिंकूनही राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनला १२ लाखांचा दंड ठोठावण्यात आला. स्लो ओव्हर-रेटमुळे हा दंड ठोठावण्यात आला.

IPL 2021 PBKS vs RR: “तर्कशून्य निर्णय”, ‘त्या’ निर्णयामुळे सुनील गावसकर ‘पंजाब किंग्स’वर संतापले

आयपीएलने दिलेल्या माहितीनुसार, २१ सप्टेंबरला पंजाब किंग्सविरोधात झालेल्या सामन्यात स्लो ओव्हर रेटमुळे राजस्थान रॉयल्स संघाचा कर्णधार संजू सॅमसनला दंड ठोठावण्यात आला आहे. या हंगामात पहिल्यांदाच राजस्थान रॉयल्सकडून ही चूक झाली असल्याने आचारसंहितेनुसार सॅमसनला १२ लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

RR vs PBKS : रंगतदार सामन्यात राजस्थानचा पंजाबवर विजय, शेवटच्या षटकात फिरला सामना

राजस्थान रॉयल्सने जिंकला सामना

नाणेफेक गमावलेल्या संजू सॅमसनच्या संघाने प्रथम फलंदाजी करत एविन लुईस, यशस्वी जयस्वाल आणि महिपाल लोमरोर यांच्या योगदानाच्या जोरावर पंजाबला १८६ धावांचे आव्हान दिले. पंजाबकडून अर्शदीप सिंगने ३२ धावांत ५ बळी घेतले. प्रत्युत्तरात पंजाबचे सलामीवीर केएल राहुल आणि मयंक अग्रवाल यांनी १२० धावांची दमदार सलामी दिली. मयंकने अर्धशतकी खेळी केली. शेवटच्या षटकात घडलेल्या नाट्यमय घडामोडीनंतर पंजाबला २० षटकात १८२ धावाच करता आल्या. त्यागीला सामनावीर पुरस्कार मिळाला.


शेवटच्या षटकात फिरला सामना

शेवटच्या षटकात पंजाबला विजयासाठी ४ धावांची गरज असताना कार्तिक त्यागीच्या गोलंदाजीवर पूरन वैयक्तिक ३२ धावांवर बाद झाला. त्यानंतर त्यागीने एक चेंडू निर्धाव टाकला. पुढच्या चेंडूवर त्याने दीपक हुडाला यष्टीपाठी झेलबाद केले. एका चेंडूत तीन धावांची गरज असताना त्यागीने फॅबियन एलनला धाव घेऊ दिली नाही आणि राजस्थानने आपला विजय साजरा केला. दुसऱ्या बाजूला असलेला मार्कराम २६ धावांवर नाबाद राहिला.