आगामी इंडियन प्रीमियर लीगच्या लिलावासाठी (आयपीएल २०२२) साठी खेळाडूंच्या रिटेन्शन पॉलिसीबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. सध्याच्या आठ फ्रेंचायझींना जास्तीत जास्त चार खेळाडू कायम ठेवण्याची परवानगी दिली जाण्याची शक्यता आहे. महेंद्रसिंह धोनी, रवींद्र जडेजा, ऋतुराज गायकवाड आणि फाफ डू प्लेसिस किंवा ड्वेन ब्राव्हो या दोघांना सीएसकेमध्ये आयपीएल २०२२ साठी रिटेन केले जाण्याची दाट शक्यता आहे.

यासह, दोन नवीन आयपीएल संघांना लिलावाबाहेर दोन किंवा तीन खेळाडू निवडण्याची परवानगी दिली जाऊ शकते. (यात कोणतेही प्रमुख भारतीय खेळाडू उपलब्ध नसल्यास विदेशी खेळाडूंचाही समावेश आहे). आयपीएल संघांना मेगा लिलावासाठी आरटीएम कार्ड मिळण्याची शक्यता नाही. क्रिकबझच्या अहवालानुसार, यूएईमध्ये नुकत्याच संपलेल्या आयपीएलच्या काही अंतिम दिवसांमध्ये भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (बीसीसीआय) आणि संघाचे प्रतिनिधी यांच्यात अनौपचारिक चर्चा झाली. यावर सर्व पक्षांचे एकमत झाल्याचे मानले जाते.

हेही वाचा – ‘‘रोहित हा भारताचा इंझमाम, त्याला पाकिस्तानमध्ये विराटपेक्षाही…” शोएब अख्तरचा मोठा खुलासा

क्रिकबझने पूर्वी नोंदवल्याप्रमाणे, एका संघाला जास्तीत जास्त तीन भारतीय आणि दोन परदेशी खेळाडू ठेवण्याची परवानगी असेल, एकूण संख्या चारपेक्षा जास्त नसेल. अनकॅप्ड खेळाडू ठेवण्याची मर्यादा देखील असू शकते. एका टीमला दोनपेक्षा जास्त अनकॅप्ड खेळाडू ठेवण्याची परवानगी दिली जाणार नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दोन नवीन संघांच्या विक्रीनंतर लवकरच रिटेन्शन पॉलिसीची औपचारिक घोषणा केली जाईल. २२ ऑक्टोबर ते २५ ऑक्टोबरदरम्यान ही घोषणा होण्याची शक्यता आहे. काही बोली लावणारे पक्ष प्रत्यक्षात दुबईला पोहोचले आहेत. आयपीएल फ्रेंचाइजीकडे जास्तीत जास्त ९० कोटी रुपयांची पर्स आहे. म्हणजेच, कोणतीही फ्रेंचायझी आपली टीम बनवण्यासाठी खेळाडूंवर जास्तीत जास्त ९० कोटी रुपये खर्च करू शकते.
आयपीएल २०२२ मध्ये ही रक्कम ९० कोटी वरून ९५ कोटी किंवा १०० कोटी पर्यंत वाढवली जाऊ शकते.