IPL 2024 Mock Auction: सनरायझर्स हैदराबादचे माजी मुख्य प्रशिक्षक टॉम मूडी यांनी आयपीएल २०२४च्या लिलावाबाबत काही अंदाज वर्तवले आहेत. त्यांच्या मते, ऑस्ट्रेलियाचा मधल्या फळीतील फलंदाज स्टीव्ह स्मिथला कोणीही खरेदीदार सापडणार नाही. अनेक वर्षांनंतर मिचेल स्टार्क आयपीएल लिलावात सहभागी होणार आहे, त्यामुळे त्याची सर्वाधिक किंमतीला विक्री होण्याची शक्यता आहे, असे मूडीने म्हटले आहे. क्रिकइन्फोला दिलेल्या मुलाखतीत, टॉम मूडीने आयपीएल २०२४ लिलावाबाबत पाच अंदाज उघड केले. तो म्हणाला, “मला वाटते की स्टीव्ह स्मिथला आयपीएल लिलावात कोणीही खरेदीदार सापडणार नाही. स्टीव्ह स्मिथने आपला शेवटचा आयपीएल सामना २०२१मध्ये खेळला होता.”

दुसरीकडे, टॉम मूडीने असेही सांगितले की, “यावेळी आयपीएल २०२४ मध्ये कोणत्या खेळाडूला सर्वाधिक बोली लागू शकते आणि सॅम करनचा १८ कोटी ५० लाख रुपयांचा विक्रम कोण मोडू शकतो, हे पाहणे उत्सुकतेचे असणार आहे.” मूडी पुढे म्हणाले, “मला वाटते की मिशेल स्टार्क यावेळी सॅम करनचा १८ कोटी ५० लाख रुपयांचा लिलाव विक्रम मोडू शकतो आणि त्याची बोली त्यापेक्षा जास्त असू शकते.”

LSG Assistant Coach Sreedharan Sriram on Mayank Yadav
LSG vs RR : राजस्थानविरुद्ध वेगवान गोलंदाज मयंक यादव खेळणार की नाही? एलएसजीचे सहाय्यक प्रशिक्षक म्हणाले…
Candidates winner D Gukesh reaction that Viswanathan Anand sir guidance is valuable
विशी सरांचे मार्गदर्शन मोलाचे! ‘कँडिडेट्स’ विजेत्या गुकेशची प्रतिक्रिया; मायदेशात जंगी स्वागत
UPSC third topper Donuru Ananya Reddy told Virat Kohli is her inspiration
VIDEO : UPSC परिक्षेत तिसरा क्रमांक पटकावणारी अनन्या मानते कोहलीला आदर्श; म्हणाली, “विराटचा अ‍ॅटिट्यूड…”
Akash Chopra Says Hardik Pandya’s yet but his absence is definitely hurting GT this season
IPL 2024 : “त्याच्या उपस्थितीचा मुंबईला फायदा झाला नसेल, पण…”, हार्दिक पंड्याबाबत माजी क्रिकेटपटूचं मोठं वक्तव्य

टॉम मूडीने शाहरुख खानबद्दल भविष्यवाणी केली आणि म्हणाले, “चेन्नई सुपर किंग्ज या लिलावात शाहरुख खानला विकत घेतील आणि त्यांची बोली ९ कोटींच्या पुढे जाणार आहे.” आयपीएल लिलावानंतर कोणत्या संघाकडे सर्वात जास्त पैसे असतील हे देखील मूडी यांनी सांगितले. ते म्हणाले, “आयपीएल लिलावानंतर, गुजरात टायटन्स हा असा संघ आहे ज्याच्या खिशात सर्वात जास्त पैसे शिल्लक असतील.”

हेही वाचा: IPL 2024 Auction: काव्या मारन ते जुही चावलाच्या मुलीपर्यंत, लिलावात प्रत्येक फ्रँचायझीची कोणती व्यक्ती हजर राहणार? जाणून घ्या

आपल्या शेवटच्या अंदाजात मूडी यांनी म्हटले आहे की, “नुकत्याच संपलेल्या विश्वचषकात चांगली कामगिरी करणारे खेळाडू लिलावात वर्चस्व गाजवतील. आयपीएल लिलावासाठी ३३३ क्रिकेटपटूंची निवड करण्यात आली आहे. यापैकी २३ खेळाडू आहेत ज्यांनी त्यांची मूळ किंमत २ कोटी रुपये ठेवली आहे. मी तुम्हाला सांगतो की, सध्या आयपीएलच्या आगामी हंगामासाठी ७७ खेळाडूंची जागा रिक्त आहे, याचा अर्थ लिलावात जास्तीत जास्त खेळाडू विकले जाऊ शकतात. त्यापैकी ३० परदेशी खेळाडूंसाठी जागा आहे.”

दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी आयपीएल मॉक ऑक्शन जिंकले. यावेळी गुजरात टायटन्सने दक्षिण आफ्रिकेच्या गेराल्ड कोएत्झीला सर्वाधिक रक्कम देऊन विकत घेतले. त्याचवेळी पॅट कमिन्सच्या नावावर रेकॉर्डब्रेक बोलीही पाहायला मिळाली. दुबईत होणाऱ्या आयपीएल २०२४ लिलावाच्या एक दिवस आधी एक मॉक ऑक्शन आयोजित करण्यात आला होता, ज्यामध्ये सर्व फ्रँचायझींनी खेळाडूंवर बोली लावली होती. सुरेश रैना, माईक हसन आणि इऑन मॉर्गनसारखे खेळाडू मॉक ऑक्शनमध्ये तज्ञांच्या पॅनेलमध्ये फ्रँचायझींचे प्रतिनिधित्व करताना दिसले.

मॉक ऑक्शनमध्ये सुरेश रैनाने चेन्नई सुपर किंग्जचे, इऑन मॉर्गनने सनरायझर्स हैदराबादचे आणि माईक हसनने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे प्रतिनिधित्व केले. या लिलावात ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेतील खेळाडूंनी मोठी खेळी केली. ज्यामध्ये जेराल्ड कोएत्झी, मिचेल स्टार्क, शार्दुल ठाकूर आणि पॅट कमिन्स हे सर्वात महागडे खेळाडू होते.

हेही वाचा: IPL 2024 Auction: आयपीएल २०२४ लिलाव प्रथमच भारताबाहेर; तुम्ही ते थेट विनामूल्य पाहू शकता केव्हा, कधी आणि कुठे? जाणून घ्या

कोएत्झी १८.५ कोटींना गुजरात टायटन्सला, सनरायजर्सने कमिन्सला १७.५० कोटींना खरेदी केले

मॉक ऑक्शनमध्ये गुजरात टायटन आणि सनरायझर्स हैदराबादने सर्वाधिक बोली लावली. यावेळी जीटीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या पार्थिव पटेलने १८.५ कोटी रुपयांना जेराल्ड कोएत्झीला खरेदी केले. तसेच ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्कला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने नेमक्या याच किमतीत विकत घेतले. तर ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सला हैदराबादने १७.५० कोटींना विकत घेतले.

भारतीय खेळाडूंबद्दल जर बोलायचे झाले तर शार्दुल ठाकूरला मोठी रक्कम मिळाली. पंजाब किंग्जने संपूर्ण १८ कोटी रुपये खर्च करून अष्टपैलू खेळाडूला खरेदी केले. याशिवाय, आयपीएल सुरेश रैना, सीएसकेचे प्रतिनिधित्व करत असून, ऑस्ट्रेलियाच्या ट्रॅविस हेडला ७.५ कोटी रुपयांमध्ये आणि श्रीलंकेच्या वानिंदू हसरंगाला ८.५ कोटी रुपयांमध्ये समाविष्ट केले आहे.