IPL Auction 2024 Date Time Player List: इंडियन प्रीमियर लीगची पुढील आवृत्ती, भारतात खेळली जाणारी जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग मार्च २०२४ मध्ये सुरू होईल. त्यापूर्वी १९ डिसेंबर २०२३ रोजी आयपीएलचा लिलाव होणार आहे. आयपीएलचा लिलाव पहिल्यांदाच भारताबाहेर होत असून, यावेळी तो दुबईत होणार आहे. येथे आम्ही तुम्हाला आयपीएल लिलावाशी संबंधित काही महत्त्वाची माहिती देत आहोत. चाहते आयपीएल लिलावाचे थेट प्रक्षेपण आणि थेट प्रवाह कुठे पाहू शकतात? आयपीएल लिलाव किती वाजता सुरू होईल, याचा संपूर्ण तपशील तुम्ही इथे जाणून घेऊ शकतात.

इंडियन प्रीमियर लीगच्या २०२४ हंगामासाठी मंगळवारी दुबईतील कोका-कोला एरिना येथे लिलाव होणार आहे. या कालावधीत एकूण ३३३ खेळाडूंचा लिलाव होणार आहे, तर संघांना ७७ स्लॉट आहेत, त्यापैकी ३० विदेशी खेळाडूंसाठी राखीव आहेत. २३ खेळाडूंनी २ कोटी रुपयांच्या ब्रॅकेटमध्ये स्वतःची नोंदणी केली आहे, तर १३ खेळाडूंनी १.५ कोटी रुपयांच्या स्लॉटमध्ये राहणे पसंत केले आहे. ३३३ खेळाडूंपैकी २१४ भारतीय आणि ११९ विदेशी खेळाडू आहेत, ज्यात दोन सहयोगी देशांचा समावेश आहे. कॅप्ड खेळाडूंची एकूण संख्या ११६ आहे, तर अनकॅप्ड खेळाडूंची संख्या २१५ आहे.

tax harvesting in marathi
Money Mantra: टॅक्स हार्वेस्टिंग म्हणजे काय? त्याचा वापर कसा कराल? केव्हा टाळाल?
boys did dangerous stunt with car to make reels video went viral on social media
रिल्ससाठी जीवघेणा स्टंट! मित्राला प्लास्टिकच्या रॅपरमध्ये गुंडाळले अन् चालत्या कारच्या बाहेर…
Viral Video Woman Requested TTE To Change Train Coach Due To Overcrowding Of Male Passengers
VIDEO: ‘तक्रारींकडे दुर्लक्ष’ हीच तक्रार! गर्दीमुळे कोच बदलण्याची विनंती; टीटीईचं दुर्लक्ष; म्हणाला, ‘मी रेल्वे मंत्री…’
April electricity bill may go up by ten percent
वीज दरवाढीचे चटके कमी करण्याचा विचारच नाही?

आयपीएलचा लिलाव देशाबाहेर होण्याची ही पहिलीच वेळ आहे. गुजरात टायटन्स ३८.१५ कोटी रुपयांच्या कमाल पर्ससह लिलावात प्रवेश करेल, तर राजस्थान रॉयल्सकडे सर्वात कमी १४.५ कोटी रुपये पर्समध्ये आहे. त्याआधी हार्दिक पंड्याचे गुजरात टायटन्समधून मुंबई इंडियन्समध्ये जाण्याची चर्चा खूप रंगली होती. पाच वेळा आयपीएल चॅम्पियन्सने रोहित शर्माच्या जागी पंड्याला आयपीएल २०२४ साठी त्यांचा नवा कर्णधार म्हणून घोषित केले आहे.

आयपीएल २०२४चा लिलाव १९ डिसेंबरला किती वाजता सुरू होईल?

आयपीएलचा पहिला लिलाव भारतीय वेळेनुसार दुपारी अडीच वाजता सुरू होणार होता पण आता त्याची वेळ बदलली आहे. स्थानिक वेळेनुसार, सकाळी ११.३० वाजता सुरू होईल आणि भारतीय वेळेनुसार, लिलाव दुपारी १.०० वाजता सुरू होईल.

यंदाच्या आयपीएलमध्ये किती खेळाडू आणि किती जागा?

आयपीएल लिलावासाठी ३३३ क्रिकेटपटूंची निवड करण्यात आली आहे. यापैकी २३ खेळाडू आहेत ज्यांनी त्यांची मूळ किंमत २ कोटी रुपये ठेवली आहे. सध्या आयपीएलच्या आगामी हंगामासाठी ७७ खेळाडूंची जागा रिक्त आहे, याचा अर्थ लिलावात जास्तीत जास्त खेळाडू विकले जाऊ शकतात. त्यापैकी ३० परदेशी खेळाडूंसाठी जागा राखीव ठेवण्यात आली आहे.

हेही वाचा: AUS vs PAK: ऑस्ट्रेलियाने बॉक्सिंग-डे कसोटीसाठी आठ दिवस अगोदरच केला संघ जाहीर, ‘या’ वेगवान गोलंदाजाला वगळले

कोणते चॅनेल आयपीएल २०२४ लिलाव दूरदर्शनवर थेट प्रसारित करतील?

स्टार स्पोर्ट्स हे आयपीएल २०२४ लिलावाचे अधिकृत प्रसारक आहे. दर्शक स्टार स्पोर्ट्स २, स्टार स्पोर्ट्स २ एचडी, स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट १, स्टार स्पोर्ट्स १ एचडी, स्टार स्पोर्ट्स १ हिंदी, स्टार स्पोर्ट्स १ एचडी हिंदी, स्टार स्पोर्ट्स ३, स्टार स्पोर्ट्स प्रथम, स्टार स्पोर्ट्स १ तमिळ, स्टार स्पोर्ट्स १ एचडी तमिळ, तुम्ही स्टार स्पोर्ट्स १ तेलुगु, स्टार स्पोर्ट्स १ एचडी तेलुगु आणि स्टार स्पोर्ट्स १ कन्नड वर लिलावाचे थेट प्रक्षेपण पाहू शकता. तसेच, जिओ सिनेमाच्या वेबसाइटवर आयपीएलचा लिलाव ऑनलाइन दाखवला जाईल. जिओ सिनेमाच्या अ‍ॅपवर लाईव्ह स्ट्रीमिंग पाहता येईल.