कोलकाता आणि राजस्थान यांच्यात बुधवारी झालेल्या सामन्यात राजस्थानचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. राजस्थानच्या संघासाठी हा सामना खास होता. राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूंनी मैदानात पाऊल टाकताच एक पराक्रम केला. कोलकाताविरूद्ध खेळण्यात येणारा सामना हा राजस्थानच्या संघासाठी IPLच्या इतिसहासातील १५०वा सामना ठरला. याच सामन्यात राजस्थानच्या जयदेव उनाडकटने स्मार्ट गोलंदाजीचा नमुना पेश केला.
पाचव्या षटकात कोलकाताच्या गोलंदाजांनी पॉवर-प्लेचा फायदा घेण्याचं ठरवलं. सुनील नारायणने उनाडकटच्या गोलंदाजीवर हल्लाबोल केला. षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर त्याने षटकार आणि चौथ्या चेंडूवर चौकार लगावला. त्यानंतर उनाडकटने शांतपणे विचार करत पुढील चेंडू धीम्या गतीने टाकला. त्याच चेंडूवर आणखी एक मोठा फटका खेळण्याच्या नादात नारायण त्रिफळाचीत झाला.
दरम्यान, IPLच्या इतिहासात १५० सामन्यांचा टप्पा गाठणारा राजस्थान आठवा संघ ठरला. राजस्थान आणि चेन्नईचा संघ स्पॉट फिक्सिंगमुळे दोन वर्षे स्पर्धेतून निलंबित होता. पण निलंबनाच्या आधी आणि नंतर चेन्नईने जवळपास सर्वच हंगामात बाद फेरी गाठली. त्यामुळे चेन्नईने १५० सामन्यांचा टप्पा आधीच गाठला होता. पण राजस्थानने मात्र बुधवारी १५० सामन्यांचा टप्पा पार केला.