चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामना चांगलाच अटीतटीचा ठरला. चेन्नईचा या पर्वातील शेवटचा सामना होता. या सामन्यात मोईन अली चांगलाच तळपला. त्याने ५७ चेंडूंमध्ये १३ चौकार आणि ३ षटकार लगावत तब्बल ९३ धावा केल्या.

हेही वाचा >>> ड्रेसिंग रुममध्ये त्रागा करणं भोवलं, आयपीएलने मॅथ्यू वेडवर केली ‘ही’ कारवाई

दुसऱ्या विकेटसाठी आल्यानंतर सुरुवातीपासून मोईन अलीने आक्रमकपणे फलंदाजी केली. त्याने वेळ मिळताच जोराचा फटके मारले. प्रसिध कृष्णाच्या एका षटकात त्याने तीन चौकार आणि एक षटकार लगावला. त्याच्या याच आक्रमक खेळीमुळे राजस्थानचे गोलंदाज भेदरले होते. मोईन अलीमुळे चेन्नई संघ १५० धावांपर्यंत मजल मारू शकला.

हेही वाचा >>>महेंद्रसिंह धोनी आयपीएलच्या पुढच्या पर्वात खेळणार का ? निवृत्तीबद्दल माहीने स्पष्टच सांगितले, म्हणाला…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मोईन अली वगळता चेन्नईच्या अन्य खेळाडूंनी निराशा केली. मोईन अलीचे शतक मात्र तीन धावांनी हुकले. ओबेड मॅक्कॉयने टाकलेल्या चेंडूवर तो ९३ धावांवर झेलबाद झाला. तर दुसरीकडे महेंद्रसिंह धोनीने २६ धावा करत मोईन अलीला काही प्रमाणात साथ दिली. मात्र तोही युझवेंद्र चहलच्या चेंडूवर झेलबाद झाला. आघाडीचे खेळाडू अंबाती रायडू, ऋतुराज गाडकवाड यांनी निराशा केली.