इंडियन प्रीमियर लीग २०२२ च्या 50 व्या सामन्यात, दिल्ली कॅपिटल्स (DC) ने सनरायझर्स हैदराबाद (SRH) चा २१ धावांनी पराभव केला. मुंबईतील बेब्रॉन स्टेडियमवर हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना दिल्ली संघाने २० षटकांत ३ गडी गमावून २०७ धावा केल्या. हैदराबादने २०८धावांच्या लक्ष्याला प्रत्युत्तर देताना २० षटकांत ८ बाद १८६ धावा केल्या. या विजयासह दिल्लीचा संघ गुणतालिकेत पाचव्या क्रमांकावर पोहोचला आहे. हैदराबादचा संघ सलग तिसरा सामना हरला आहे.

हैदराबादची सुरुवात चांगली झाली नाही. दुसऱ्याच षटकात खलील अहमदने अभिषेक शर्माला पॅव्हेलियनमध्ये पाठवून पहिला धक्का दिला. एनरिक नॉर्टजेने हैदराबादला आणखी एक धक्का दिला. त्याने केन विल्यमसनला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. मिचेल मार्शने राहुल त्रिपाठीला बाद करून संघाला तिसरा धक्का दिला. एडन मार्करामला खलील अहमदने पॅव्हेलियनमध्ये पाठवले. शार्दुल ठाकूरने शशांक सिंगला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. १७ व्या षटकात खलील अहमदने सीन अॅबॉटला बाद करून हैदराबादला सहावा धक्का दिला. नंतर शार्दुल ठाकूरने निकोलस पूरनला बाद केले आणि अखेरच्या षटकात कुलदीप यादवने कार्तिक त्यागीला बाद केले.

दिल्ली कॅपिटल्सचा संघ –

डेव्हिड वॉर्नर, मनदीप सिंग, मिचेल मार्श, ऋषभ पंत (w/c), ललित यादव, रोवमन पॉवेल, रिपल पटेल, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, खलील अहमद, एनरिक नॉर्टजे

सनरायझर्स हैदराबादचा संघ –

अभिषेक शर्मा, केन विल्यमसन (कर्णधार), राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम, निकोलस पूरन, शशांक सिंग, श्रेयस गोपाल, भुवनेश्वर कुमार, सीन अॅबॉट, कार्तिक त्यागी, उमरान मलिक</p>