Devon Conway Out Of IPL 2024 : आयपीएलचा जवळपास निम्मा हंगाम संपला आहे. संघ एकमेकांना मागे टाकण्यासाठी स्पर्धा करत आहेत, जेणेकरून ते प्लेऑफमध्ये आपले स्थान निश्चित करू शकतील. काही संघांचा हंगाम चांगला चालला आहे, तर काही संघांचा हंगाम खूपच खराब आहे. दरम्यान, ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जला मोठा धक्का बसला आहे. डेव्हॉन कॉनवे आयपीएलच्या संपूर्ण हंगामातून बाहेर पडला आहे. त्याच्या बदलीची घोषणाही संघाने केली आहे. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज रिचर्ड ग्लीसनचा संघात समावेश करण्यात आला आहे.

डेव्हॉन कॉनवेला झाली होती दुखापत –

आयपीएलच्या १७व्या हंगामाला सुरुवात होण्यापूर्वी डेव्हॉन कॉनवेला दुखापत झाली होती. ज्यामुळे तो हंगामाच्या सुरुवातीपासूनच संघाच्या बाहेर होता. गेल्या दोन वर्षांपासून सीएसकेकडून खेळत असलेल्या कॉनवेबद्दलच्या बातम्या आधीच आल्या होत्या की, तो किमान अर्ध्या हंगामानला मुकू शकतो. त्यामुळे तो नंतर परतेल अशी अपेक्षा होती, पण आता बातमी आली आहे की तो संपूर्ण हंगामासाठी बाहेर पडला आहे. आयपीएल २०२३ मध्ये डेव्हॉन कॉनवे चेन्नई सुपर किंग्जसाठी सर्वाधिक धावा केल्या होत्या.

IPL 2024 Playoffs Scenario for RCB
IPL 2024: १८ धावा किंवा १८.१ षटके… आरसीबी की चेन्नई कोण गाठणार प्लेऑफ, वाचा कसं आहे समीकरण?
MS Dhoni Only Given Limited Batting In CSK Trainer Explains Why
MS धोनीला शेवटच्याच षटकांमध्ये फलंदाजी देण्याचं कारण अखेरीस आलं समोर; प्रशिक्षक म्हणाले, “त्याचे शॉट्स..”
Confirmed Rohit Sharma does not stay with Mumbai Indians team in Mumbai
रोहित शर्माने सांगितलं मुंबई इंडियन्सच्या संघासह न राहण्याचं कारण; म्हणाला, “आता माझ्या हातात तर..”
unique wedding card Marriage Card viral on social media
अरे बापरे! लग्नपत्रिका वाचूनच घाबरले पाहुणे; लग्नाला जायचं की नाही? VIRAL लग्नपत्रिका पाहून पोट धरुन हसाल
Ishan Kishan reprimanded, Ishan Kishan fined for breaching IPL Code of conduct
DC vs MI: मुंबई इंडियन्सच्या पराभवानंतर इशान किशनवर दंडात्मक कारवाई, वाचा काय आहे कारण?
Video Neeta Ambani Requesting Chats With Rohit Sharma
नीता अंबानी रोहित शर्माला काय म्हणाल्या? मुंबईच्या दहाव्या पराभवानंतर ‘ते’ संभाषण कॅमेऱ्यात कैद, Video पाहा
What Is BCCI's New Toss Rule
BCCI चा मोठा निर्णय! आता सामन्यापूर्वी नसणार नाणेफेकीची गरज, प्रथम फलंदाजी की गोलंदाजी करणार? जाणून घ्या
How Chennai Super Kings Qualify for Playoffs
IPL 2024: चेन्नईचा संघ प्लेऑफमध्ये जाणार? पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर ही आहेत समीकरणं

रिचर्ड ग्लीसन इंग्लंडचा वेगवान गोलंदाज –

कॉनवेच्या अनुपस्थितीत सीएसकेने रिचर्ड ग्लीसनचा संघात समावेश केल्याचे जाहीर केले आहे. तो वेगवान गोलंदाजी करतो आणि त्याने टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात इंग्लंडकडून ६ सामने खेळले आहेत आणि ९ विकेट्स घेतल्या आहेत. दरम्यान, कॉनवेच्या अनुपस्थितीत न्यूझीलंडचा रचिन रवींद्र कर्णधार ऋतुराज गायकवाडसह डावाची सुरुवात करत असून तो आतापर्यंत चांगली कामगिरी करत आहे.

हेही वाचा – Rohit Sharma: ‘भारतीय क्रिकेट संघाला याचा काहीच फायदा नाही’, आयपीएलमधील इम्पॅक्ट खेळाडू नियमाबद्दल रोहितचे मोठे वक्तव्य

चेन्नईचा संघ गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर –

ऋतुराज गायकवाड पहिल्यांदाच आयपीएलमध्ये सीएसकेचे नेतृत्व करत आहे. त्याच्या नेतृत्वाखाली, संघाने आतापर्यंत ६ सामने खेळले आहेत आणि त्यापैकी ४ जिंकले आहेत, तर दोन सामन्यांमध्ये संघाचा पराभव झाला आहे. संघाचे एकूण ८ गुण आहेत आणि ते गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. आतापर्यंतच्या कामगिरीच्या आधारे संघ प्लेऑफमध्ये पोहोचेल, अशी अपेक्षा आहे. उर्वरित सामन्यांमध्ये संघ कसा कामगिरी करतो हे पाहणे बाकी आहे.