IPL 2022, GT vs RR : जोस बटलरने राजस्थानला सावरलं, गुजरातसमोर १८९ धावांचे लक्ष्य

गुजरात टायटन्सने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

JOS BUTLER
जोस बटलर (फोटो-iplt20.com)

आयपीएल २०२२ च्या क्वॉलिफाय-१ सामन्यात राजस्थानचा जोस बटलर हा फलंदाज चांगलाच तळपला आहे. त्याने चौकार आणि षटकार यांचा पाऊस पाडत ५६ चेंडूंमध्ये ८९ धावा केल्या आहेत. बटलरच्या या मोठ्या खेळीमुळेच राजस्थान रॉयल्स संघ १८८ धावांपर्यंत मजल मारू शकला. तर गुजरातला विजयासाठी १८९ धावा कराव्या लागणार आहेत.

हेही वाचा >> IPL 2022, GT vs RR : क्वॉलिफायर-१ मध्ये संजू सॅमसनच्या नावावर नवा विक्रम, धोनीला टाकलं मागे

गुजरात टायटन्सने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या राजस्थानची खराब सुरुवात झाली. संघाच्या ११ धावा झालेल्या असताना राजस्थानचा यशस्वी जैस्वाल हा खेळाडू अवघ्या तीन धावा करून तंबुत परतला. त्यानंतर मात्र सलामीला आलेल्या जोस बटलरने धमाकेदार फलंदाजी केली. त्याने १२ चौकार आणि दोन षटकार लगावत ५६ चेंडूंमध्ये ८९ धावा केल्या.

हेही वाचा >> महिला टी-२० चॅलेंज : महाराष्ट्राची माया सोनवणे तळपली, गोलंदाजी ठरतेय चर्चेचा विषय; पाहा व्हिडीओ

तसेच बटलरला साथ देत संजू सॅमसनने २६ चेंडूंमध्ये ४७ धावा करत संघाला सावरण्याचा प्रयत्न केला. देवदत्त पडिक्कलनेदेखील २८ धावा केल्या. ज्यामुळे राजस्थान संघ वीस षटकांत समाधानकार धावसंख्या उभारु शकला.

मराठीतील सर्व आयपीएल २०२२ ( Ipl ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Gt vs rr qualifier 1 jos butler scored half century gujarat titan need 189 runs prd

Next Story
IPL 2022, GT vs RR : क्वॉलिफायर-१ मध्ये संजू सॅमसनच्या नावावर नवा विक्रम, धोनीला टाकलं मागे
फोटो गॅलरी