कोलकाता आणि राजस्थान यांच्यात बुधवारी झालेल्या सामन्यात राजस्थानचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. राजस्थानच्या संघासाठी हा सामना खास ठरला. राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूंनी मैदानात पाऊल टाकताच एक पराक्रम केला. कोलकाताविरूद्ध खेळण्यात येणारा सामना हा राजस्थानच्या संघासाठी IPLच्या इतिसहासातील १५०वा सामना ठरला. या सामन्यात आंद्रे रसलच्या फटकेबाजीची छोटीशी झलक पाहायला मिळाली.
कोलकाताकडून आंद्रे रसल खेळण्यासाठी आला. गेल्या दोन सामन्यात त्याला फारसा चांगला खेळ जमला नव्हता. या सामन्यात मात्र रसलने दमदार फटकेबाजी करण्यास सुरूवात केली. रसलने श्रेयस गोपालला लगावलेला षटकार विशेष चर्चेचा विषय ठरला. १३व्या षटकात श्रेयस गोपाल गोलंदाजी करत होता. षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर रसलने त्याला दमदार षटकार लगावला. गोपालने टाकलेला चेंडू मारताना रसलने गुडघ्यावर बसून उत्तुंग असा षटकार लगावला. पण चांगली सुरूवात मिळूनही तो ३ षटकारांसह त्याने २४ धावा करून बाद झाला.
पाहा व्हिडीओ-
दरम्यान, नाणेफेक जिंकून राजस्थानच्या स्टीव्ह स्मिथने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना कोलकाताचा सलामीवीर सुनील नारायण याने चाहत्यांची निराशा केली. १४ चेंडूत २ चौकार आणि एका षटकारासह १५ धावा करून तो माघारी परतला. नितीश राणाने चांगली सुरूवात केली होती, पण तो १७ चेंडूत २२ धावा करून बाद झाला. दिनेश कार्तिकही एका धावेवर बाद झाला. पण इयॉन मॉर्गनने मात्र संयमी खेळी आणि मोक्याच्या क्षणी फटकेबाजी करत कोलकाताला १७०पार पोहोचवले. त्याने १ चौकार आणि २ षटकार लगावत २३ चेंडूत नाबाद ३४ धावा केल्या.