मुंबई : फलंदाजीच्या चिंतेवर मात करीत इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) विजयपथावर परतण्याचा निर्धार राजस्थान रॉयल्सने केला आहे. वानखेडे स्टेडियमवर शनिवारी राजस्थानपुढे बलाढय़ गुजरात टायटन्सला हरवण्याची किमया साधणाऱ्या पंजाब किंग्जचे आव्हान असेल. राजस्थानचे १० सामन्यांत सहा विजय आणि चार पराभवांसह १२ गुण असून गुणतालिकेत ते तिसऱ्या स्थानावर आहेत, तर पंजाबचे १० सामन्यांत पाच विजय आणि पाच पराभवांसह १० गुण असून ते गुणतालिकेत सातव्या स्थानावर आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जोस बटलर राजस्थानच्या फलंदाजीचा कणा असून, यंदाच्या मोसमात सर्वाधिक ५८८ धावांसह तो अव्वल स्थानावर आहे. मात्र त्याला इतरांची साथ मिळणे आवश्यक आहे. गोलंदाजीत फिरकीपटू यजुर्वेद्र चहल सर्वाधिक १९ बळींसह गोलंदाजांमध्ये अग्रस्थानावर आहे. त्याला आर.अश्विनची चांगली साथ मिळत आहे. परंतु वेगवान गोलंदाजांना कामगिरी सुधारावी लागेल. दुसरीकडे, पंजाबच्या फलंदाजीत शिखर धवन पुन्हा लयीत परतला आहे. कर्णधार मयांक अगरवाल, लियाम लििव्हगस्टोन यांनी आपल्या कामगिरीत सातत्य राखणे गरजेचे आहे. गोलंदाजीत कॅगिसो रबाडाला अर्शदीप सिंग, ऋषी धवन यांची उत्तम साथ मिळत आहे.

  • वेळ : दुपार ३.३० वा.
  • थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, २, १ हिंदी, सिलेक्ट १ (संबंधित एचडी वाहिन्यांवर)
मराठीतील सर्व आयपीएल २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian premier league cricket rajasthan punjab kings get back track ysh
First published on: 07-05-2022 at 01:20 IST