IPL 2020 MI vs KKR Updates: सलामीवीर क्विंटन डी कॉकच्या नाबाद अर्धशतकी खेळीच्या जोरावर मुंबईने कोलकाताविरूद्धच्या सामन्यात ८ गडी राखून दणदणीत विजय मिळवला. कोलकाताच्या संघाने पॅट कमिन्सच्या अर्धशतकाच्या मदतीने १४८ धावांपर्यंत मजल मारली होती. या आव्हानाचा पाठलाग करताना डी कॉक ७८ धावांवर नाबाद राहिला. या विजयासह मुंबईचा संघ गुणतालिकेत १२ गुणांसह अव्वलस्थानी विराजमान झाला.
१४९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना क्विंटन डी कॉक आणि रोहित शर्मा जोडीने दमदार सुरूवात केली. डी कॉकने अर्धशतक झळकावल्यानंतर रोहितने फटकेबाजीस सुरूवात केली होती, पण तो ३५ धावांवर बाद झाला. सूर्यकुमार यादवही १० धावांवर बाद झाला. पण डी कॉक मात्र फटकेबाजी करत राहिला. त्याने ९ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ४४ चेंडूत नाबाद ७८ धावा केल्या. हार्दिक पांड्याने ११ चेंडूत २१ धावा करत त्याला उत्तम साथ दिली.
त्याआधी कोलकाताचा नवा कर्णधार इयॉन मॉर्गनने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी स्वीकारली पण त्याचा निर्णय फसला. सलामीवीर राहुल त्रिपाठी ७ धावांवर बाद झाला. नितीश राणाही ५ धावा करून बाद झाला. खेळपट्टीवर स्थिरावलेला शुबमन गिलही चुकीच्या फटक्यामुळे झेलबाद झाला. त्याने २३ चेंडूत २१ धावा केल्या. पुढच्याच चेंडूवर दिनेश कार्तिकही ४ धावांवर बाद झाला. राहुल चहरने २ चेंडूमध्ये २ बळी टिपत कोलकाताची अवस्था वाईट केली. पाठोपाठ आंद्रे रसलही अयशस्वी ठरला. पण कर्णधार इयॉन मॉर्गन-अष्टपैलू पॅट कमिन्स या जोडीने कोलकाताचा डाव सावरला. या दोघांनी शेवटपर्यंत खेळपट्टीवर तळ ठोकून संघाला १४८पर्यंत मजल मारून दिली. पॅट कमिन्सने पहिले अर्धशतक ठोकत नाबाद ५३ धावा केल्या. कर्णधार मॉर्गनने नाबाद ३९ धावा केल्या.
IPL 2020 MI vs KKR: सलामीवीर क्विंटन डी कॉकच्या नाबाद अर्धशतकी खेळीच्या जोरावर मुंबईने कोलकाताविरूद्धच्या सामन्यात ८ गडी राखून दणदणीत विजय मिळवला. कोलकाताच्या संघाने पॅट कमिन्सच्या अर्धशतकाच्या मदतीने १४८ धावांपर्यंत मजल मारली होती. या आव्हानाचा पाठलाग करताना डी कॉक ७८ धावांवर नाबाद राहिला. या विजयासह मुंबईचा संघ गुणतालिकेत १२ गुणांसह अव्वलस्थानी विराजमान झाला.
स्विपचा फटका खेळण्याच्या प्रयत्नात सूर्यकुमार यादव माघारी, सामन्यात रंगत कायम
शिवम मवीच्या गोलंदाजीवर रोहित शर्मा बाद, ३५ धावा काढून रोहित बाद
सलामीच्या जोडीसाठी रोहित- डी कॉकची ९४ धावांची भागीदारी
रोहित शर्मासोबत फटकेबाजी करत डी-कॉकची आश्वासक खेळी
१४९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईचे सलामीवीर क्विंटन डी कॉक आणि रोहित शर्मा यांनी दमदार सुरूवात केली.
अष्टपैलू पॅट कमिन्सचं अर्धशतक (नाबाद ५३) आणि त्याला कर्णधार इयॉन मॉर्गनने दिलेली उत्तम साथ याच्या बळावर मुंबईविरूद्धच्या सामन्यात कोलकाताने २० षटकात ५ बाद १४८ धावा केल्या.
निम्मा संघ लवकर तंबूत परतल्यानंतर कर्णधार इयॉन मॉर्गन- अष्टपैलू पॅट कमिन्स या जोडीने कोलकाताचा डाव सावरला आणि अर्धशतकी भागीदारी केली. यांनी संघाला शतकी धावसंख्याही गाठली.
मोठ्या फटक्यांसाठी ओळखला आंद्रे रसल आजही अयशस्वी ठरला. बुमराहने टाकलेल्या उसळत्या चेंडूवर त्याने किपरकडे झेल दिला. त्याने अवघ्या १२ धावा केल्या.
खेळपट्टीवर स्थिरावलेला शुबमन गिल चुकीच्या फटक्यामुळे झेलबाद झाला. त्याने २३ चेंडूत २१ धावा केल्या. पुढच्याच चेंडूवर दिनेश कार्तिकही ४ धावांवर बाद झाला. राहुल चहरने २ चेंडूमध्ये २ बळी टिपत कोलकाताची अवस्था वाईट केली.
नितीश राणाला फारसा प्रभाव पाडता आला नाही. ५ धावा करून तो बाद झाला. यंदाच्या हंगामात पहिला सामना खेळणाऱ्या कुल्टर नाईल त्याला बाद केले.
दमदार सुरूवात करण्याच्या इराद्याने उतरलेला राहुल त्रिपाठी स्वस्तात बाद झाला. ७ धावांवर असताना सूर्यकुमार यादवने त्याचा अप्रतिम झेल टिपला.
दिनेश कार्तिकने फलंदाजीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी स्पर्धेच्या मध्यातच कर्णधारपद सोडलं. अशाप्रकारे कर्णधाराने पदत्याग करण्याची पहिली वेळ नाही. पाहा कोण-कोणत्या दिग्गजांना या गोष्टीला सामोरं जावं लागलं आहे...
टॉम बॅन्टन, कमलेश नागरकोटी संघातून बाहेर... ख्रिस ग्रीन, शिवम मावीला संधी
वेगवान गोलंदाज जेन्स पॅटिन्सन संघाबाहेर... नॅथन कुल्टर-नाईलला संधी
कोलकाताच्या नेतृत्वबदलाला नशिबाची साथ मिळाली. नाणेफेक जिंकून नवा कर्णधार इयॉन मॉर्गन याने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला