IPL 2022, KKR vs LSG Match Updates : आयपीएल २०२२ च्या ६६ व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सने कोलकाता नाईट रायडर्सचा २ धावांनी पराभव केला. यावेळी हाय व्होल्टेज सामना पाहायला मिळाला. लखनऊने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. लखनऊच्या संघात तीन बदल करण्यात आले आहेत.प्रथम फलंदाजी करताना लखनऊने १९ षटकांत एकही विकेट न गमावता २१० धावा केल्या. डी कॉकने आयपीएलमधील आपले दुसरे शतक झळकावले. या सामन्यात डिकॅकने ७० चेंडूत १४० धावा करून नाबाद राहिला. कर्णधार केएल राहुलने ५१ चेंडूत ६१ धावा केल्या आहेत. प्रत्युत्तरात कोलकाता नाईट रायडर्सला २० षटकांत ७ गडी गमावून २०८ धावाच करता आल्या. संघाला २ धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले.

२११ धावांच्या लक्ष्याला प्रत्युत्तर देताना कोलकाताच्या संघाला चांगली सुरुवात करता आली नाही. व्यंकटेश अय्यरला पहिल्याच षटकात मोहसीन खानने बाद केले. त्याने तिसऱ्याच षटकात नवोदित अभिजित तोमरला बाद केले. आठव्या षटकात नितीश राणाला के गौतमने बाद केले. मार्क्स स्टॉइनिसने १४व्या षटकात श्रेयस अय्यरला बाद केले. १६व्या षटकात सॅम बिलिंग्सला रवी बिश्नोईने बाद केले. मोहसीन खानने १७व्या षटकात आंद्रे रसेलला बाद केले. त्यानंतर रिंकू सिंहने दमदार खेळी करत सामन्यात रंगत आणली. रिंकूने १५ चेंडूत ४० धावा केल्या. मात्र स्टॉइनिसने त्याला बाद केले.

शेवटच्या षटकात कोलकाताला विजयासाठी २१ धावांची गरज होती. मार्क्स स्टॉइनिस शेवटचे षटक टाकण्यासाठी आला. रिंकूने त्याच्या पहिल्याच चेंडूवर चौकार मारला. दुसऱ्या चेंडूवर आणि तिसऱ्या चेंडूवर रिंकूने सलग सहा षटकार ठोकत कोलकात्याला विजयाच्या उंबरठ्यावर आणले. चौथ्या चेंडूवर दोन धावा घेतल्या. पाचव्या चेंडूवर एविन लुईसने रिंकू सिंहचा अप्रतिम झेल घेतला. उमेश यादव शेवटच्या चेंडूवर बाद झाला. लखनऊने हा सामना २ धावांनी जिंकला.