IPL 2024 Prize Money List Updates : आयपीएल २०२४च्या फायनल सामन्यात कोलकाताने हैदराबादवर मात करत १० वर्षांनी विजेतेपद पटकावले. चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर झालेल्या सामन्यात केकेआरने सनरायझर्स हैदराबादचा ८ गडी राखून पराभव करत तिसऱ्यांदा ट्रॉफीवर नाव कोरले. या विजयासह श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील केकेआरला ट्रॉफीसह २० कोटी रुपयांची बक्षीस रक्कम मिळाली. पण केवळ केकेआरवरच कोट्यवधी रुपयांचा वर्षाव झाला नाही, तर जेतेपदाच्या लढतीत पराभूत झालेल्या हैदराबादलाही कोट्यवधी रुपये बक्षीस म्हणून मिळाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हैदराबादवरही कोट्यवधी रुपयांचा पाऊस पडला –

विजेतेपदाच्या लढतीत पराभूत झालेल्या सनरायझर्स हैदराबाद संघावरही करोडो रुपयांचा वर्षाव झाला. पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील हैदराबादला उपविजेतेपदासाठी १२.५ कोटी रुपये बक्षीस म्हणून मिळाले. त्याचबरोबर आयपीएल २०२४ मध्ये तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर राहिलेल्या संघानाही बक्षीस म्हणून घसघशीत रक्कम मिळाली.

तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाचे संघही बनले करोडपती –

विशेष म्हणजे केवळ विजेतेपद पटकावणाऱ्या केकेआर आणि उपविजेत्या सनरायझर्स हैदराबादपुरते मर्यादित राहिले नाही, तर तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर टूर्नामेंट पूर्ण करणारे संघही करोडपती म्हणून परतले. राजस्थान रॉयल्स संघ तिसरा आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू चौथ्या स्थानावर आहे. तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावरील संघांना अनुक्रमे ७ आणि ६.५ कोटी रुपये मिळाले.

हेही वाचा – KKR तिसऱ्यांदा चॅम्पियन ठरल्यानंतर खेळाडूंसह गौतम गंभीर-शाहरुख खानच्या आनंदाला उधाण, VIDEO व्हायरल

केकेआरने १० वर्षांनी तिसऱ्यांदा कोरले ट्रॉफीवर नाव –

कोलकाताने सनरायझर्स हैदराबादचा आठ गडी राखून पराभव केला. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील संघ तिसऱ्यांदा विजेतेपद पटकावण्यात यशस्वी ठरला. लक्ष्याचा पाठलाग करताना कोलकाताने व्यंकटेश अय्यर आणि गुरबाज अहमद यांच्या अर्धशतकी भागीदारीमुळे सामना जिंकला. रविवारी चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात कोलकाताने बॉल आणि बॅट दोन्हीसह चमकदार कामगिरी केली आणि पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील संघाला कधीही वरचढ होऊ दिले नाही. कोलकाताने याआधी २०१४ च्या मोसमात पंजाब किंग्जचा पराभव करून शेवटचे विजेतेपद पटकावले होते आणि आता १० वर्षांनंतर संघाने पुन्हा ट्रॉफीवर कब्जा केला आहे.

हेही वाचा – IPL 2024 Final : एमएस धोनीच्या ‘होम ग्राउंड’ने रचला इतिहास, चेपॉक स्टेडियमने नोंदवला ‘हा’ खास पराक्रम

कोलकाताने हैदराबादचा ८ गडी राखून उडवला धुव्वा –

सामन्याबद्दल बोलायचे झाले, तर सनरायझर्स हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना १८.३ षटकात सर्व १० गडी गमावून ११३ धावा केल्या. कर्णधार पॅट कमिन्सने सर्वाधिक 24 धावांची खेळी खेळली. केकेआरचा स्टार अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेलने शानदार गोलंदाजी केली. त्याने २.३ षटकात ७.६च्या इकॉनॉमीसह १९ धावा दिल्या आणि ३ बळीही घेतले. त्यांच्याशिवाय हर्षित राणा आणि मिचेल स्टार्कने प्रत्येकी २ बळी घेतले. प्रत्युत्तरात कोलकाताने १०.३ षटकांत २ गडी गमावून ११४ धावा केल्या. व्यंकटेश अय्यरने अर्धशतक (५२) केले. रहमानउल्ला गुरबाजने ३२ चेंडूत ३९ धावांची खेळी साकारली.

मराठीतील सर्व आयपीएल २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2024 prize money winner kolkata knight riders get 20 crore runner up sunrisers hyderabad get 12 point 5 crore rupees vbm
First published on: 27-05-2024 at 00:50 IST