IPL 2024, Punjab Kings vs Mumbai Indians: आयपीएलमधील ३३व्या सामना मुंबई इंडियन्स वि पंजाब किंग्स यांच्यात खेळवला गेला. या सामन्यात मुंबईने पंजाबला ऑल आऊट करत ९ धावांनी निसटता विजय नोंदवला. कडवी झुंज दिलेल्या आशुतोष शर्मा आणि शशांक सिंगची खेळी पुन्हा एकदा व्यर्थ ठरली. या सामन्यात मुंबईकडून तिलक वर्माच्या एका शॉटने सर्वांचे लक्ष वेधले, या शॉटमुळे स्पायडर कॅमेराला तडाखा बसला खरा पण त्याचा फटका मात्र पंजाबला बसल्याचे दिसले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हर्षल पटेलच्या षटकातील चौथ्या चेंडूवर ही घटना घडली. हर्षलच्या चेंडूवर तिलकने डीप मिड-विकेटच्या दिशेने फटका मारला. त्याच भागात स्पायडर कॅमेराही तैनात होता, तिलकने लगावलेल्या चेंडूच्या मार्गात आलेला स्पायडर कॅमेरावर हा चेंडू आदळला आणि पुन्हा खेळपट्टीवर पडला. पंचांनी हा चेंडू गृहित न धरता डेड बॉलचा इशारा केला. त्यामुळे पटेलला पुन्हा चौथा चेंडू टाकावा लागला ज्यामुळे तो चांगलाच वैतागलेला दिसला. पण तिलकचा हा शॉट जर स्पायडर कॅमला लागला नसता तर कदाचित तिलक झेलबादही होऊ शकला असता.

प्रथम फलंदाजीला उतरल्यानंतर, सूर्यकुमार यादवच्या शानदार खेळीच्या जोरावर मुंबईने निर्धारित २० षटकांत ७ बाद १९२ अशी मोठी धावसंख्या उभारली. पंजाबसाठी हर्षल पटेलने चार षटकांत ३१ धावा देत ३ विकेट्स घेत सर्वोत्तम गोलंदाजी केली. प्रत्युत्तरात, शशांक सिंग आणि आशुतोष शर्मा यांच्या वादळी खेळीच्या जोरावर पंजाब लक्ष्याच्या जवळ पोहोचले पण अखेरीस १९.१ षटकांत १८३ धावांवर संघ ऑल आऊट झाला.

मुंबईकडून जसप्रीत बुमराह आणि गेराल्ड कोएत्झी यांनी प्रत्येकी तीन विकेट घेतले. या विजयासह मुंबईचा संघ सात सामन्यांत तीन विजयांसह सहा गुण मिळवत गुणतालिकेत सातव्या स्थानावर पोहोचले. पंजाब सात सामन्यांत दोन विजयांसह चार गुण मिळवत नवव्या स्थानावर घसरला आहेत.