जोस बटलरने केलेल्या आक्रमक सुरुवातीनंतरही मधल्या फळीतल्या फलंदाजांनी हाराकिरी केल्यामुळे राजस्थानचा संघ पुन्हा एकदा कोलमडला. कोलकात्याच्या संघातील गोलंदाजांनी मधल्या षटकांमध्ये टिच्चून मारा करत राजस्थानच्या डावाला वेसण घातली. कुलदीप यादवने राजस्थानच्या डावाला खिंडार पाडत ४ फलंदाजांना माघारी धाडलं. याव्यतिरीक्त आंद्रे रसेल, प्रसिध कृष्णा यांनी प्रत्येकी २-२ बळी घेत कुलदीपला चांगली साथ दिली. राजस्थानकडून अखेरच्या फळीत जयदेव उनाडकटने फटकेबाजी करत संघाच्या डावाला चांगला आकार दिला. दरम्यान, कोलकाताच्या दिनेश कार्तिक आणि अॅन्ड्र्यू रसेल यांनी नाबाद राहत ५१ धावांची भागिदारी करीत आपल्या संघाला विजय मिळवून दिला. कोलकाता नाईट रायडर्सने राजस्थान रॉयल्सचा विजय रथ रोखत ६ गडी राखून सहज विजय मिळवला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
  • कोलकाताचा राजस्थानवर ६ गडी राखून विजय
  • ख्रिस लिनच्या रुपाने कोलकात्याचा चौथा गडी माघारी
  • इश सोधीच्या गोलंदाजीवर नितीश राणा माघारी, कोलकात्याचा तिसरा गडी माघारी
  • कोलकात्याने ओलांडला ५० धावसंख्येचा टप्पा
  • नितीश राणा – ख्रिस लिन जोडीकडून संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न
  • कोलकात्याचा दुसरा गडी माघारी
  • रॉबिन उथप्पा पुन्हा अपयशी, स्टोक्सच्या गोलंदाजीवर झेलबाद
  • बेन स्टोक्सच्या गोलंदाजीवर नरीन माघारी, कोलकात्याला पहिला धक्का
  • सुनिल नरीनची मैदानात चौफेर फटकेबाजी
  • सुनिल नरीन आणि ख्रिस लीन जोडीकडून डावाची आक्रमक सुरुवात
  • कोलकात्याकडून डावाची आक्रमक सुरुवात
  • कोलकात्याला विजयासाठी १४३ धावांची गरज
  • २० षटकात राजस्थानची १४२ धावांपर्यंत मजल
  • जोफ्रा आर्चर आणि जयदेव उनाडकट एकामागोमाग एक माघारी
  • जोफ्रा आर्चरची फटकेबाजी
  • इश सोधी माघारी, राजस्थानला आठवा धक्का
  • जयदेव उनाडकटची फटकेबाजी, राजस्थानचा डाव सावरण्याचा प्रयत्न
  • कुलदीप यादवचे सामन्यात आतापर्यंत ४ बळी
  • बेन स्टोक्स माघारी, राजस्थानचा सातवा गडी तंबूत परतला
  • कुलदीप यादवचा भेदक मारा, राजस्थानचा आणखी एक गडी माघारी परतला
  • शिवम मवीच्या गोलंदाजीवर कृष्णप्पा गौथम माघारी, राजस्थानचा सहावा गडी माघारी
  • चांगल्या सुरुवातीनंतरही राजस्थानचा डाव घसरला, निम्मा संघ माघारी
  • ठराविक अंतराने स्टुअर्ड बिन्नी यष्टीचीत, कुलदीप यादवने घेतला बळी
  • सुनील नरीनच्या गोलंदाजीवर सॅमसन पायचीत, राजस्थानचा चौथा गडी माघारी
  • राजस्थानचा तिसरा गडी माघारी
  • ठराविक अंतराने कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर बटलर माघारी
  • राजस्थानचा दुसरा गडी माघारी
  • कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर रिव्हर्स स्विपचा फटका खेळताना रहाणे माघारी
  • रहाणे-बटलर जोडीकडून संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न
  • राजस्थानची जमलेली जोडी फुटल, दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी ६३ धावांची भागीदारी
  • अखेर राजस्थानला पहिला धक्का, राहुल त्रिपाठी माघारी
  • चौथ्याच षटकात राजस्थानने गाठला ५० धावांचा टप्पा
  • शिवम मवीच्या गोलंदाजीवर बटलरने कुटल्या २८ धावा
  • जोस बटलर, राहुल त्रिपाठीची आक्रमक फटकेबाजी
  • राजस्थानच्या फलंदाजांची आक्रमक सुरुवात
  • कोलकात्याने नाणेफेक जिंकली, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय

मराठीतील सर्व आयपीएल २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2018 kkr vs rr live updates
First published on: 15-05-2018 at 19:53 IST