IPL 2020 DC vs KXIP: नव्या दमाचे कर्णधार लोकेश राहुल आणि श्रेयस अय्यर यांच्यात स्पर्धेतील दुसरा सामना रंगला. सामन्यात राहुलने नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्याचा निर्णय अंतिम काही षटके वगळता बरोबर ठरला. पण शेवटच्या काही षटकांमध्ये मार्कस स्टॉयनीसने तुफान फटकेबाजी केली. त्याच्या १८ चेंडूतील अर्धशतकी खेळीने दिल्लीला १५०पार धावसंख्या नेण्यास मदत केली. त्यानंतर पंजाबच्या फलंदाजीच्या वेळी एक गोष्ट घडली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पंजाबचा माजी कर्णधार रविचंद्रन अश्विन याने या सामन्यात पहिल्याच चेंडूवर पंजाबच्या फलंदाजाचा बळी टिपला. अश्विन हा गेल्या हंगामात पंजाब संघाकडून खेळत होता. त्याने संघाचे नेतृत्व केले, पण त्यांनी विजेतेपद मिळवता आले नाही. त्यामुळे अश्विनला ट्रेड करून दिल्लीच्या संघात पाठवण्यात आले. पण नेमका हाच अश्विन पंजाबसाठी डोकेदुखी ठरली. पहिल्याच चेंडूवर त्याने करूण नायरला झेलबाद केले. त्यानंतर त्याच षटकात त्याने धडाकेबाज निकोलस पूरनलादेखील त्रिफळाचीत केलं.

पहिला बळी-

दुसरा बळी-

दरम्यान, दिल्लीच्या डावात दिल्लीच्या संघाचे पहिले ३ गडी झटपट बाद झाले. पृथ्वी शॉसोबत चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात झालेल्या गोंधळामुळे शिखर धवन माघारी परतला. मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात सलामीवीर पृथ्वी शॉ देखील ५ धावा काढून बाद झाला. तर पाठोपाठ शिमरॉन हेटमायरही ७ धावा काढून बाद झाला. त्यामुळे दिल्लीची अवस्था ३ बाद २२ होती. त्यानंतर ऋषभ पंत आणि कर्णधार श्रेयस अय्यर यांनी डाव सावरला. ते दोघेही बाद झाल्यावर अखेर स्टॉयनिस फटकेबाजी करत अर्धशतक ठोकलं आणि संघाला १५०पार पोहोचवले.

मराठीतील सर्व आयपीएल २०२० बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Clean bowled video r ashwin former punjab captain takes 2 wickets in first over dc vs kxip vjb
First published on: 20-09-2020 at 22:41 IST