IPL 2020: किंग्ज इलेव्हन पंजाबने आपल्या दुसऱ्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला उद्ध्वस्त करून टाकले. लोकेश राहुलच्या धडाकेबाज शतकाच्या जोरावर पंजाबने २० षटकात २०६ धावांचा डोंगर उभारला. या आव्हानाचा पाठलाग करताना बंगळुरूचा संघ १७ षटकात १०९ धावांतच गारद झाला. त्यामुळे पंजाबला तब्बल ९७ धावांनी मोठा विजय मिळाला. ६९ चेंडूत नाबाद १३२ धावा ठोकणारा लोकेश राहुल सामनावीर ठरला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नाणेफेक जिंकून विराट कोहलीने प्रथम गोलंदाजी निर्णय घेतला पण पंजाबचा कर्णधार लोकेश राहुल याने तो निर्णय़ चुकीचा ठरवून दाखवला. मयंक अग्रवाल आणि राहुलने संघाला चांगली सुरुवात करून दिली. मयंक अग्रवाल २० चेंडूत २६ धावा काढून बाद झाला. निकोलस पूरनदेखील मोठा फटका खेळताना १७ धावा करून माघारी परतला. तर ग्लेन मॅक्सवेलने ५ धावा केल्या आणि तो बाद झाला. पण कर्णधार राहुल मात्र एका बाजूने खेळत राहिला. येणाऱ्या प्रत्येक गोलंदाजाला अस्मान दाखवण्याचा विडा उचलल्याप्रमाणे त्याने फलंदाजी केली. विराट कोहलीने तब्बल दोनदा त्याचा झेल सोडला. त्याचा फायदा घेत राहुलने तुफानी शतक ठोकलं. त्याने ६९ चेंडूत नाबाद १३२ धावा केल्या. त्यात १४ चौकार आणि ७ षटकारांचा समावेश होता.

या आव्हानाचा पाठलाग करताना बंगळुरूचा संघ १०९ धावांवरच गारद झाला. सलामीला आलेला देवदत्त पडीकल एका धावेवर माघारी परतला. पाठोपाठ जोशुआ फिलीप (०), विराट कोहली (१) हे दोघेही लगेच बाद झाले. त्यामुळे बंगळुरूची अवस्था ३ बाद ४ धावा अशी झाली होती. त्यानंतर फिंच आणि डीव्हिलियर्स जोडीने काही काळ खेळपट्टी सांभाळली, पण फिंच २० धावांवर तर डीव्हिलियर्स २८ धावांवर माघारी परतला. वॉशिंग्टन सुंदरने सर्वाधिक ३० धावांची खेळी केली पण त्यालाही फासरा प्रभाव पाडता आला नाही. अखेर १७ व्या षटकातच बंगळुरूचा संघ १०९ धावांत गारद झाला. रवि बिश्नोई आणि मुरूगन अश्विन या फिरकी जोडगोळीने ३-३ बळी टिपले.

मराठीतील सर्व आयपीएल २०२० बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2020 kxip vs rcb updates kl rahul virat kohli umesh yadav dale steyn vjb
First published on: 24-09-2020 at 21:28 IST