फॉर्मात असलेल्या किंग्ज इलेव्हन पंजाबचा विजयरथ रोखत स्टिव्ह स्मिथच्या राजस्थान रॉयल्सने आयपीएलच्या तेराव्या हंगामात आणखी रंगत आणली आहे. शुक्रवारी झालेल्या सामन्यात ख्रिस गेलच्या धडाकेबाज ९९ धावांच्या खेळीच्या जोरावर पंजाबने राजस्थानसमोर विजयासाठी १८६ धावांचं आव्हान ठेवलं होतं. त्याआधी ख्रिस गेलने राजस्थानच्या गोलंदाजांची धुलाई करत मैदानावर चौफेर फटकेबाजी केली. पहिल्या षटकापासून मैदानावर तळ ठोकलेल्या ख्रिस गेलला अखेरच्या षटकात आपलं शतक पूर्ण करण्याची नामी संधी होती. परंतू जोफ्रा आर्चरने टाकलेल्या भन्नाट यॉर्करवर गेल त्रिफळाचीत झाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ख्रिस गेलच्या या विकेटनंतर जोफ्रा आर्चरचं एक जुनं ट्विट पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. २२ फेब्रुवारी २०१३ रोजी आर्चरने मला माहिती आहे मी बॉलिंग करत असेन तर तो शतक करु शकणार नाही…अशा आशयाचं एक ट्विट केलं होतं. ९९ धावांवर गेल बाद झाल्यानंतर आर्चरचं हे ट्विट पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरतंय.

९९ वर बाद झाल्यानंतर ख्रिल गेलने रागाच्या भरात मैदानावर आपली बॅट फिरकावली. क्रिकेटप्रेमींनी या प्रसंगाला अनुरुप जोफ्रा आर्चरचं एक ट्विट शोधून काढलंय. ३१ मार्च २०१६ रोजी जोफ्रा आर्चरने हे ट्विट केलं होतं.

राजस्थानकडून बेन स्टोक्स आणि संजू सॅमसनने फटकेबाजी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

Web Title: Kxip vs rr jofra archers old tweets go viral after chris gayle bowled on 99 psd
First published on: 31-10-2020 at 14:14 IST