हैदराबादविरूद्धच्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने २० षटकांत १६० पार मजल मारली. कोलकाताचे आजी-माजी कर्णधार दिनेश कार्तिक आणि इयॉन मॉर्गन या जोडीने शेवटच्या काही षटकांत दमदार फटकेबाजी करत संघाला १६३ धावांचा पल्ला गाठून दिला. या दोघांची अर्धशतकी भागीदारी कोलकातासाठी महत्त्वाची ठरली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नाणेफेक जिंकून हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. कोलकाताच्या संघाकडून राहुल त्रिपाठी आणि शुबमन गिल या दोघांनी तडाखेबाज सुरूवात केली. पॉवरप्लेच्या षटकांमध्ये त्यांनी ४८ धावा झोडल्या. सामन्याच्या दुसऱ्याच षटकात बासिल थंपी गोलंदाजी करत असताना शुबमन गिलने चेंडू हवेत उडवला. चेंडू झेलण्यासाठी राशिद खान धावला आणि मैदानावर बसला. पण दुर्दैवाने त्याच्या हातून झेल सुटला. त्यावेळी गिल एका धावेवर खेळत होता. त्यानंतर गिलने ३५ धावा केल्या.

दरम्यान, पॉवरप्लेच्या शेवटच्या चेंडूवर त्रिपाठी त्रिफळाचीत झाला. त्याने २३ धावा केल्या. नंतर शुबमन गिल आणि नितीश राणाने फटकेबाजी केली. पण गिल ५ चौकारांसह ३६ धावांवर तर नितीश राणा ३ चौकार व एका षटकारासह २९ धावांवर बाद झाला. धोकादायक आंद्रे रसल आजही स्वस्तात (९) बाद झाला. त्यानंतर संघाचे आजी-माजी कर्णधार दिनेश कार्तिक आणि इयॉन मॉर्गन यांनी शेवटपर्यंत तळ ठोकला. ३० चेंडूत या दोघांनी ५८ धावांची भागीदारी केली. कार्तिकने २ चौकार आणि २ षटकारांसह नाबाद २९ धावा केल्या. तर इयॉन मॉर्गनने 3 चौकार आणि एका षटकारासह ३४ धावा केल्या.

मराठीतील सर्व आयपीएल २०२० बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Video rashid khan dropped shubman gill catch early ipl 2020 kkr vs srh vjb
First published on: 18-10-2020 at 18:27 IST