KKR and Shah Rukh Khan Teased BCCI After Winning IPL Trophy? – कोलकाता नाईट रायडर्सने आयपीएल २०२४चे विजेतेपद पटकावले आहे. एकतर्फी विजेतेपदाच्या लढतीत केकेआरने सनरायझर्स हैदराबादचा लाजिरवाणा पराभव केला. चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर पहिल्याच षटकापासून कोलकाताने वर्चस्व गाजवले आणि सामन्यात एकदाही हैदराबादला पुनरागमन करण्याची संधी दिली नाही. मालक शाहरुख खानच्या या संघाने तिसऱ्यांदा आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे. हा संघ यापूर्वी २०१२ आणि २०१४ मध्ये चॅम्पियन बनला आहे. पण या विजयानंतर केकेआर संघाने शाहरूखसोबत एक आगळंवेगळं सेलिब्रेशन केलं, ज्याचा व्हीडिओ सध्या व्हायरल होत असून चर्चेचा विषय ठरत आहे.

श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील कोलकाता नाईट रायडर्सने आयपीएल ट्रॉफी जिंकल्यानंतर फ्लाइंग किस देऊन आनंद साजरा केला. ट्रॉफी घेतल्यानंतर केकेआरचा मालक शाहरुख खानने स्वतः सर्व खेळाडूंना ही पोज देण्यास सांगितले. शाहरुखने आधी सर्वांना काय करायचं आहे ते समजावून सांगितले. यानंतर शाहरुखने स्वतः आणि टीमचे सर्व खेळाडू तसेच सपोर्ट स्टाफने कॅमेऱ्यासमोर फ्लाइंग किस दिले आणि आनंद साजरा केला.

What Kangana Said?
कंगनाचा धक्कादायक दावा, “कोणतीही नवी हिरोईन आली की तिला दाऊदसमोर..”
Shikhar Dhawan and Mithali Raj Marriage Talks
‘मी मिताली राजशी लग्न करत आहे…’, शिखर धवनचा मोठा खुलासा, जाणून घ्या नक्की काय आहे प्रकरण?
Gautam Gambhir offered blank cheque by Shah Rukh Khan to be with KKR for 10 years
.. म्हणून गौतम गंभीरला शाहरुखने ब्लँक चेक दिला? BCCI मुळे केकेआरचं १० वर्षांचं गणित ‘असं’ बदलण्याच्या चर्चा
puneri pati viral there is no love like father Emotional Slogan Written Behind puneri riksha Video
“आज पाहिलेली सगळ्यात भारी पुणेरी पाटी” रिक्षामागची पाटी पाहून व्हाल भावूक; पुण्यातला VIDEO व्हायरल
Nagpur Results Nitin Gadkari Major Win Can Change Prime Minister Power Game
नितीन गडकरींचा विजय पालटणार सत्तेचा खेळ? ज्योतिषतज्ज्ञ म्हणतायत, “२०२४ पर्यंत काळजी, तर २०२६ ला मोठा..”
IPL 2024 Prize money updates in marathi
IPL 2024 Prize Money : जेतेपदानंतर कोलकाता टीम मालामाल, उपविजेत्या हैदराबादवरही पैशांचा पाऊस
What Kiran Mane Said About Manusmruti?
“सुंदर स्त्री हीन जातीतली असली तरी तिला भोगण्यात…”, ‘मनुस्मृती’तलं वाक्य सांगत किरण मानेंची खरमरीत पोस्ट
navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत

हेही वाचा – IPL 2024: विराट कोहलीपासून ते नवख्या नितीश रेड्डीपर्यंत हे खेळाडू ठरले मोठ्या पुरस्कारांचे मानकरी, एका क्लिकवर पाहा यादी

फ्लाइंग किस हा मुद्दा आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील मोठा चर्चेचा विषय ठरला . कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील सामन्यात संघाचा गोलंदाज हर्षित राणाने मयंक अग्रवालला बाद केल्यानंतर त्याला फ्लाइंग किस देत विकेटचे सेलिब्रेशन केले. त्याच्या या सेलिब्रेशनमुळे हर्षितवर दंड ठोठावण्यात आला. त्यानंतर हर्षितने दिल्ली कॅपिटल्सच्या सामन्यातही असाच काहीसा प्रतार करण्याचा प्रयत्न केला. पण यावेळी बीसीसीआयने थेट त्याच्यावर एका सामन्याची बंदी घातली. आता आयपीएल जिंकल्यानंतर केकेआरच्या सेलिब्रेशनने ते जणू काही बीसीसीआयला चिडवत आहेत, असं चाहत्यांच म्हणणं आहे.

चेन्नईच्या एम ए चिदंबरम स्टेडियमवर झालेल्या आयपीएल सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण हा निर्णय वगळता अंतिम सामन्यातील एकही गोष्ट त्यांच्या मनासारखी घडली नाही. हैदराबादचा संघ १८.३ षटकांत अवघ्या ११३ धावांत आटोपला. आयपीएल फायनलमधील ११३ ही धावसंख्या आतापर्यंतची सर्वात कमी धावसंख्या आहे. कमिन्सने सर्वाधिक २४ धावा केल्या. रसेलने ३ तर स्टार्क आणि हर्षित राणा यांनी २-२ विकेट घेतल्या. केकेआरने १०.३ षटकांत ८ गडी राखून सामना जिंकला. व्यंकटेश अय्यरने २६ चेंडूत ५२ धावांची खेळी खेळली. अय्यरने क्वालिफायर-१ मध्येही अर्धशतक झळकावले होते. मिचेल स्टार्क हा अंतिम सामन्याचा सामनावीर ठरला.