Kolkata Knight Riders vs Lucknow Super Giants Score Today, 20 May 2023 : आयपीएल २०२३ चा ६८ वा सामना कोलकाताच्या ईडन गार्डनमध्ये लखनऊ सुपर जायंट्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात रंगला. कोलकाता नाईट रायडर्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर मैदानात उतरलेल्या लखनऊच्या फलंदाजांची सुरुवातीला दाणादाण उडाली. परंतु, आयुष बदोनी आणि निकोलस पूरनच्या आक्रमक फलंदाजीमुळं लखनऊने २० षटकात ८ विकेट्स गमावत १७६ धावा केल्या होत्या. त्यामुळे कोलकाता नाईट रायडर्सला विजयासाठी १७७ धावांचं लक्ष्य गाठावं लागणार होतं. मात्र, लखनऊच्या फिरकीपटूंनी अप्रतिम गोलंदाजी करत कोलकाताच्या फलंदाजांना गुंडाळलं. पण रिंकू सिंगने पुन्हा एकदा चौकार षटकारांचा पाऊस पाडत ३३ चेंडूत ६ चौकार आणि ४ षटकार ठोकून ६७ धावांची नाबाद अर्धशतकी खेळी केली. परंतु, शेवटच्या चेंडूवर रिंकूने षटकार ठोकला पण विजयासाठी ८ धावांची गरज होती. त्यामुळे लखनऊचा या सामन्यात एक धावेने विजय झाला आणि लखनऊसा संघ प्ले ऑफमध्ये क्वालिफाय झाला.

कोलकाताचा सलामीचा फलंदाज जेसन रॉय आणि व्येंकटेश अय्यरने पॉवर प्ले मध्ये आक्रमक फलंदाजी करून कोलकाताला चांगली सुरुवात करून दिली. जेसन रॉयने २८ चेंडूत ७ चौकार आणि १ षटकार ठोकून ४५ धावांची खेळी साकारली. परंतु, लखनऊचा कर्णधाक कृणाल पांड्याने रॉयला क्लीन बोल्ड करून कोलकाताला मोठा धक्का दिला. त्यानंतर कृष्णाप्पा गौतमने व्यंकटेश अय्यरला २४ धावांवर असताना झेलबाद केलं. त्यानंतर कोलकाताचा कर्णधार नितीश राणाला रवी बिष्णोईने ८ धावांवर माघारी पाठवलं. गुरबाजलाही धावांचा सूरन गवसल्याने तो १० धावांवर यश ठाकूरच्या गोलंदाजीवर बाद झाला.

Three bookies arrested for betting on RCB vs Sunrisers Hyderabad IPL match
आरसीबी आणि सनरायझर्स हैदरबाद आयपीएल सामन्यात सट्टेबाजी, तीन बुकींना अटक
shashank singh
PBKS VS KKR: पंजाबने ‘करुन दाखवला’ विक्रमी पाठलाग; केकेआरविरुद्ध २६२चं लक्ष्य केलं पार
IPL 2024 Punjab Kings vs Mumbai Indians Match Updates in Marathi
IPL 2024: रोहित शर्माने तोडला पोलार्डचा मोठा विक्रम, मुंबईसाठी हा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
IPL 2024 Mumbai Indians vs Chennai Super Kings Match Updates in Marathi
MI vs CSK: आयपीएल २०२४ मध्ये ऋतु’राज’, मुंबईविरूद्ध विस्फोटक फलंदाजीसह ‘हा’ विक्रम करणारा पहिला भारतीय खेळाडू

लखनऊसाठी सलामीला उतरलेला करन शर्मा स्वस्तात माघारी परतला. शर्मा ३ धावांवर असताना हर्षीत राणाच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यानंतर क्विंटन डीकॉक आणि प्रेरक मंकडने सावध खेळी करत धावसंख्येचा आलेख वाढवला. परंतु, डीकॉक २८ धावांवर असताना वरुण चक्रवर्तीच्या फिरकीचा शिकार झाला. त्यानंतर प्रेरकही २६ धावांवर वैभव अरोराच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला.

विशेष म्हणजे लखनऊचा धडाकेबाज फलंदाज मार्कस स्टॉयनिसला या सामन्यात धावांचा सूर गवसला नाही. स्टॉयनिस वैभव अरोराच्या गोलंदाजीवर शून्यावर बाद झाला. कर्णधार कृणाल पांड्या ९ धावांवर झेलबाद झाला. पण त्यानंतर निकोलस पूरनचा वादळ आला. आयुष बदोनीनं सावध खेळी करून निकोलसला साथ दिली. बदोनीनं २५ तर पूरनने ३० चेंडूत ५ षटकार आणि ४ चौकारांच्या मदतीनं ५८ धावांची खेळी साकारली.