राजस्थान रॉयल्सवर मात करुन स्पर्धेत दिमाखदार पुनरागमन करणाऱ्या RCB संघाची अवस्था पुन्हा एकदा बिकट झाली. दुबईच्या मैदानावर झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने RCBवर ५९ धावांनी सहज मात केली. दिल्लीने विजयासाठी दिलेल्या १९७ धावांचं आव्हान बंगळुरुला पेलवलं नाही. कर्णधार विराट कोहलीचा अपवाद वगळता RCBच्या इतर सर्व फलंदाजांनी दिल्लीच्या माऱ्यासमोर शरणागती पत्करली. त्यामुळे बंगळुरुचा डाव १३७ धावांवरच आटोपला. या सामन्यात मूळचा मुंबईकर असलेला पृथ्वी शॉ याने दमदार खेळी केली. बंगळुरूवर विजय मिळवल्यानंतर त्याने मत व्यक्त केलं.
“मला असं वाटतं की स्पर्धेची ही खूपच चांगली आणि सकारात्मक सुरूवात आहे. आता हीच विजय घोडदौड कायम राखणं हे खरं आमच्यापुढील आव्हान असणार आहे. आम्ही काही योजना तयार केल्या होत्या. त्या योजनांची अंमलबजावणी करणं हे महत्त्वाचं होतं. ते आम्हाला शक्य झालं म्हणून आम्ही चांगली कामगिरी करू शकलो. सराव सत्रात जे काही ठरतं ते सामन्यात नीटपणे प्रत्यक्षात उतरवण्यात आम्ही यशस्वी ठरतो आहोत. सध्या सगळ्या बाबी नीटपणे होत आहेत. गोलंदाजी असो वा फलंदाजी असो, सारं काही उत्तम आता नीट चाललंय. त्यामुळे मी सध्याच्या आमच्या कामगिरीबद्दल खूप खुश आहे”, असे पृथ्वी शॉ म्हणाला.
Action images like these are worth every