आयपीएलच्या सामन्यांशी संबंधित सट्टेबाजी करणा-या १२ सट्टेबाजांना यवतमाळ येथे अटक करण्यात आली आहे. विराणी टॉकीज् परिसरात सट्टेबाजीचा प्रकार होत असल्याची माहिती वाणी पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी संबंधित जागेवर छापा टाकला आणि यात बारा सट्टेबाजांना अटक करण्यात आली. तसेच या सट्टेबांजांकडून काही रोकड, ४३ मोबाईल फोन्स, टीव्ही सेट, प्रिंटर, लॅपटॉप हस्तगत करण्यात आला आहे. पोलिसांनी हस्तगत केलेल्या वस्तूंची जवळपास एकूण किंमत १.८५ लाख रुपये इतकी आहे.
संग्रहित लेख, दिनांक 10th Apr 2013 रोजी प्रकाशित
आयपीएल: यवतमाळमधून १२ सट्टेबाजांना अटक
आयपीएलच्या सामन्यांशी संबंधित सट्टेबाजी करणा-या १२ सट्टेबाजांना यवतमाळ येथे अटक करण्यात आली आहे. विराणी टॉकीज् परिसरात सट्टेबाजीचा प्रकार होत असल्याची माहिती वाणी पोलिसांना मिळाली होती.

First published on: 10-04-2013 at 05:08 IST
मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raid on cricket betting den 12 held