IPL 2024, Punjab Kings vs Mumbai Indians: पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यात पंजाबच्या घरच्या मैदानावर सामना खेळवला जात आहे. रोहित शर्माच्या आयपीएल कारकिर्दीतील हा २५० वा सामना आहे. या सामन्यात रोहित शर्माने फलंदाजी करताना दोन मोठे विक्रम आपल्या नावावर केले. त्याने या यादीत मुंबई इंडियन्सच्या सर्व खेळाडूंना मागे टाकले.

पंजाब किंग्ज विरुद्ध खेळल्या जात असलेल्या या सामन्यात रोहित शर्माने २५ चेंडूत ३६ धावांची खेळी केली. यादरम्यान रोहितने २ चौकार आणि ३ षटकार लगावले. या खेळीदरम्यान रोहित शर्माने मुंबई इंडियन्सकडून आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम आपल्या नावे केला. रोहित शर्माने आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून आतापर्यंत २२४ षटकार ठोकले आहेत. यापूर्वी हा विक्रम किरॉन पोलार्डच्या नावावर होता. किरॉन पोलार्डने आयपीएलमध्ये मुंबई संघासाठी २२३ षटकार लगावले होते.

What Poonam Mahajan Said?
भाजपाने तिकिट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “मी…”
Rohit Sharma Returns As Mumbai Indians Captain In Mid Match
Video: रोहित शर्मामधील ‘कर्णधार’ परत आलाच; मुंबई इंडियन्सच्या शेवटच्या षटकात हार्दिकला बाजूला सारून काय घडलं?
Confirmed Rohit Sharma does not stay with Mumbai Indians team in Mumbai
रोहित शर्माने सांगितलं मुंबई इंडियन्सच्या संघासह न राहण्याचं कारण; म्हणाला, “आता माझ्या हातात तर..”
devendra fadnavis uddhav thackeray
“अमित शाह तुला म्हणाले दोन मोठी…”, उद्धव ठाकरेंनी फडणवीसांचा एकेरी उल्लेख करत सांगितलं शहांच्या मातोश्री भेटीवेळी काय घडलं?

आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्ससाठी सर्वाधिक षटकार लगावणारे फलंदाज

२२४ षटकार – रोहित शर्मा
२२३ षटकार – किरॉन पोलार्ड
१०५ षटकार – हार्दिक पांड्या
१०३ षटकार – इशान किशन<br>९८ षटकार – सूर्यकुमार यादव

रोहित शर्माने या खेळीत आयपीएलमधील ६५०० धावाही पूर्ण केल्या. त्याच्या आता आयपीएलमध्ये ६५०८ धावा झाल्या आहेत. आयपीएलमध्ये ६५०० किंवा त्याहून अधिक धावा करणारा तो चौथा खेळाडू ठरला आहे. त्याच्याआधी विराट कोहली, शिखर धवन आणि डेव्हिड वॉर्नर यांनाच ही कामगिरी करता आली. विराट कोहलीने ७००० धावांचा टप्पाही पार केला आहे.

आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारे खेळाडू
विराट कोहली – ७६२४ धावा
शिखर धवन – ६७६९ धावा
डेव्हिड वॉर्नर – ६५६३ धावा
रोहित शर्मा – ६५०८ धावा