सनरायजर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात षटकांची गती संथ राखल्याबद्दल दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार श्रेयस अय्यरला १२ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

मंगळवारी झालेल्या या लढतीत दिल्लीला हैदराबादने १५ धावांनी नमवले. अय्यरला या सामन्यात फलंदाज म्हणूनही छाप पाडण्यात अपयश आले. निर्धारित वेळेत दिल्लीने एक षटक कमी टाकल्यामुळे अय्यरला दंड ठोठावण्यात आला. आता आणखी एका लढतीत दिल्लीने षटकांची गती संथ राखल्यास अय्यरला किमान एका सामन्याला मुकावे लागू शकते. यापूर्वी रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरुचा कर्णधार विराट कोहलीलासुद्धा इतक्या रुपयांचाच दंड ठोठावण्यात आला होता.