scorecardresearch

IPL 2022: दोन वर्षांच्या ब्रेकनंतर ‘ती’ पुन्हा येतीये; चाहत्यांना प्रतिक्षा

IPL 2022: दोन वर्षांच्या ब्रेकनंतर यंदाच्या हंगामात परतणार ही लोकप्रिय अँकर

(Photo – Instagram)

क्रिकेट चाहत्यांमध्ये लोकप्रिय असणाऱ्या समालोचकांपैकी एक चेहरा म्हणजे मयंती लँगर. मागील अनेक वर्षांपासून क्रिकेट जगतामधील दिग्गजांबरोबर क्रिकेटसंदर्भातील टॉक शोमध्ये झळकणारी मयंती आज जगभरात लोकप्रिय झाली आहे. पुरुषांचे वर्चस्व असणाऱ्या क्रिकेट समालोचनासारख्या श्रेत्रामध्ये स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या स्त्रीयांमध्ये मयंतीचे नाव घेतले जाते. मयंती समालोचनाबरोबरच सोशल नेटवर्किंगवरही चांगलीच अॅक्टीव्ह आहे. पण गेल्या २ वर्षांपासून ती आयपीएलमध्ये दिसत नव्हती.

गेल्या दोन वर्षांपासून पडद्यावर न दिसणारी मयंती लँगर पुन्हा एकदा आयपीएलमध्ये ग्लॅमरचा तडका लगावण्यासाठी सज्ज झाली आहे. दिग्गज टेलिव्हिजन अँकर आणि माजी भारतीय क्रिकेटर स्टुअर्ट बिन्नीची पत्नी मयंती लँगर आयपीएलच्या यंदाच्या हंगामात पुन्हा एकदा दिसणार आहे. दोन वर्षांनंतर मयंती पुन्हा एकदा स्टार स्पोर्ट्सच्या ब्रॉडकास्टिंग टीमचा भाग होणार आहे.

यावेळी आयपीएलमध्ये अँकरिंग करताना दिसणार असल्याची माहिती खुद्द मयंती लँगरने ट्विटरद्वारे दिली आहे. मयंती लँगर आपल्या मुलाच्या जन्मामुळे मागील दोन आयपीएल हंगामात सहभागी होऊ शकली नव्हती. दरम्यान, IPL 2022 मध्ये संजना गणेशन, तान्या पुरोहित आणि नेरोली मेडोज सारखे अँकर देखील दिसणार आहेत.

अनेक वर्षांपासून समालोचन करणाऱ्या मयंतीला क्रिकेटमधील अनेक बारकावे ठाऊक आहेत. ती तिच्या संवाद कौशल्याने आणि क्रिकेटबद्दलच्या ज्ञानामुळे अनेकदा कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या पाहुण्यांबरोबरच प्रेक्षकांचीही मने जिंकून घेते. मयंती आणि स्टुअर्टचे २०१२ साली लग्न झाले आहे. मागील अनेक वर्षांपासून मयंती समालोचक म्हणून काम करते.  

मराठीतील सर्व आयपीएल २०२२ ( Ipl ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sports anchor mayanti langer ready to comeback after 2 years in ipl 2022 hrc

ताज्या बातम्या